तेजस्विनी, अमृता धोंगडे,अपूर्वा आणि समृद्धी यांच्यामध्ये पेटणार शाब्दिक युद्ध
“आपणं आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे” - किरण माने
मुंबई २० ऑक्टोबर,२०२२- कोर्टाची पायरी चढू नये पण बिग बॉसच्या घरात कोर्टाची पायरी चढल्याशिवाय शहाणपण येत नाही. बिग बॉसचे हे घर म्हणजे आरोप – प्रत्यारोप यांची शर्यत आहे, पण असे असून देखील काही सदस्य आपली स्पष्ट आणि रोख ठोक मतं मांडत नाहीत, आपली ठाम भूमिका मांडताना दिसत नाहीत. पण घराचा कॅप्टन होण्यासाठी काही गुणांची आवश्यकता असते. उत्तम निर्णय क्षमता, ठाम मतं असणे, स्वतः च्या मतावर ठाम उभे राहणे , चर्चेत राहणे आणि घरावर वर्चस्व असणे महत्वाचे आहे. आणि म्हणूनच बिग बॉस यांनी सदस्यांवर काल सोपवले रोख ठोक हे कार्य सोपवले. काल कॅप्टन्सीचे चार उमेदवार मिळाले तेजस्विनी, अमृता धोंगडे, अपूर्वा आणि समृद्धी आणि यांच्यामध्ये पेटणार आज शाब्दिक युद्ध.
यात तेजस्विनी करणार आहे समृद्धीवर आरोप तिचे म्हणणे आहे एक बॅगचा टास्क झाला होता ज्यामध्ये अर्थातच त्या एका टीमसाठी खेळत होत्या तेव्हा मी त्यांच्यासोबत डील करत होते त्यांचा मुद्दा असा होता कि, मला फरक पडत नाही मी एकदा कॅप्टन बनले आहे. मला असं वाटतं जर फरक नाही पडत तर मग योग्य उमेदवाराला खेळू द्या. समृद्धी स्पष्टीकरण देताना म्हणाली, कॅप्टन असल्याने असं नाहीये कि मला फक्त स्वतःचं बघायचे आहे मला माझ्या टीमचे देखील बघायचे आहे. ग्रुपच्या मेंबर्सची मत लक्षात घेऊन त्यांच्यासाठी निर्णय घेणं तिथे आवश्यक वाटत. तेजस्विनीचे म्हणणे आहे, तुमचे ग्रुप members ठरवूनच ठेवले आहेत… यानंतर दोघी आपली बाजू मांडत होत्या.
“आपणं आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे” – किरण माने
बिग बॉस यांनी सदस्यांवर काल सोपवले रोख ठोक हे कार्य. काल मिळालेल्या चार कॅप्टन्सीच्या उमेदवारांमध्ये कार्य रंगणार असून त्यांच्यामध्ये आज पेटणार शाब्दिक युद्ध. आज उमेदवार त्यांची मते मांडणार असून इतर सदस्य देखील साक्षिदार म्हणून या कार्यात सहभागी होणार आहेत. उमेदवार पर्यायी वकील यांची भूमिका निभावणार असून या कोर्टाचा जज असणार आहे कॅप्टन रोहित शिंदे.
किरण माने यांचे म्हणणे आहे, ज्यावेळेस चांगली माणसं आपल्यापासून तुटतात आणि आपल्या ग्रुपमध्ये वादंग निर्माण करणारी, गढूळता निर्माण करणारी माणसं जेव्हा येतात तेव्हा आपणं आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. निर्णय क्षमता नसल्याने तुमच्यापासून माणसं तुटतात. मॅडमना (तेजस्विनीला) असं वाटतं कि, बिग बॉस हा गेम फक्त शक्तीचा आहे… पण हा गेम शक्तीचा नसून तितकाच युक्तीचा, बुद्धीचा देखील आहे. तर युक्ती पण येऊ देत तुमच्याकडे. चार युक्तीच्या गोष्टी सांगणारा म्हातारा माणूस येऊ देत तुमच्याकडे. पण त्यांना युक्ती अत्यंत फालतू वाटली आणि म्हणनूच त्यांनी युक्तीची दोन माणसं काढून टाकली आणि एक confusing माणूस घेतला हा lack of decision मेकिंग आहे असं मला वाटतं.
“विकासचा रोबॉट झाला आहे” – मेघा घाडगे
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज योगेश आणि यशश्री समोर मेघा घाडगे विकासबद्दल बोलताना दिसणार आहेत. मेघा यांचे म्हणणे आहे, वीकेंडला देखील मी बोले विकास मी तुला समजावत होते तर तुला कळलं नाही पण या लोकांचं तुला कळलं. पण तू एकदाही appreciate केलं नाहीस कि मेघाताई मला पहिल्या दिवसापासून समजावत होती. विकास इथे खेळायला आला आहेस तू हे ऐकायला नाही आलास. प्रवचन आणि शिबिरं भरवायला बाहेर आहे वेळ तुला. मी हे पण बोलून झालं कि, हि गोष्ट आज ना उद्या ह्यांच्यावर पण फिरणार आहे जी झाली. हे आमचं बोलणं झालं आणि तेच घडलं आहे. ते काय करत आहेत मला माहिती नाही… ते काय खेळत आहेत मला कळतं नाहीते. विकासचा ROOBOT झाला आहे. ते सतत कानाशी असतात”.
कोर्टात अपूर्वा VS अमृता : हो तुझी लायकी काढणार – अमृता धोंगडे
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सुरु असलेल्या रोख ठोक या कार्यात उमेदवार आणि बाकीचे साक्षीदार बनलेले सदस्य आपल्या मनातील सर्व गोष्टी ठामपणे आणि न घाबरता बोलून दाखवत आहेत कारण हा टास्कच मुळात त्यासाठी आहे. किरण माने यांनी तेजस्विनीला मारलेला टोमणा असो वा तेजस्विनीने समृद्धीला मारलेला टोमणा असो सगळेच सदस्य आपली बाजू मांडताना दिसत आहेत. कॅप्टन्सीचे उमेदवार अपूर्वा आणि अमृता देखील आपली बाजू मांडताना दिसणार आहेत. ज्यामध्ये अमृता देखील भर कोर्टात अपूर्वाला खडे बोल सुनावणार आहे. अपूर्वाचे म्हणणे आहे, अपूर्वा जर आवाज चढवते तर दुसऱ्यांचे नीट ऐकते पण. अमृताचे म्हणणे आहे जी मुलगी एखाद्या सदस्याची लायकी काढते तर हिला मी कॅप्टन म्हणून का घेऊ ? अपूर्वा त्यावर म्हणाली, ह्याच्यावर दुनिया हसेल मला हे मान्य नाही. अमृता म्हणाली, मला हि योग्य वाटतंच नाही. हो तुझी लायकी काढणार… बघूया हा वाद अजून किती वाढला…
आता या सगळ्यावर तेजस्विनीचे काय म्हणणे असेल बघूया पुढे झाले आजच्या भागामध्ये. अजून घरात काय काय घडले हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.