Bigg Boss Marathi : अपूर्वा आणि विकासची नोक झोक…

समृद्धीने दिलेला सल्ला यशश्रीला पटला का ?

0

मुंबई,१८ ऑक्टोबर २०२२ – कालपासून बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अपूर्वा आणि विकासची नोकझोक दिसून येतं आहे. काल देखील अपूर्वाने विकासला बजावले जर मला तुझ्याविषयी काही चुगली आली तर मी आहे आणि तू आहे… माझ्यासारखी वाईट कोणी नाही.

आजपण दोघांमध्ये मजेशीर गप्पा बघायला मिळणार आहेत. अपूर्वाने विकासला सांगितले’ “पुढच्या वेळेस मी जीपण ड्युटी घेईन ती नाही घेतलीस तर मी तुझे आभार मानेन”. विकासचे  त्यावर म्हणणे आहे “जेवण मग … ? त्यावर अपूर्वाने बजावले, “विचार पण नाही करायचा. मी खरंच सांगते माझ्याबरोबर किचन नाही. मी अशी सुगरण नाहीये… मी आधीच सांगते आहे. विकास मित्रा मला खात्री आहे एक दिवस टास्कमध्ये तू मला पण उचलशील.

या घरात कुठलाही पुरुष उचलू नाही शकतं, तरी तू मला उचलशील… ज्याअर्थी तू माझी बॅग उचलीस त्याअर्थी…” विकास म्हणाला, “मला पण वाटतं आहे…” त्यावर अपूर्वाने विकासाला दिले भन्नाट उत्तरं “पण हि संधी मी तुला देणार नाही.” हे ऐकताच सगळयांना घरात हसू फुटले.

समृद्धीचा यशश्रीला मोलाचा सल्ला !
बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना बऱ्याचदा आपणं कुठे चुकतं आहोत,आपणं रागाच्या भरात काय बोलून गेलो हे कळतं नाही. आणि त्यामुळे सदस्यांना व्यक्तीबद्दल गैरसमज होऊ शकतात. आणि याविषयी आज समृद्धी यशश्री सोबत friend to friend चर्चा करताना दिसणार आहे.

समृद्धी यशश्रीला सांगताना दिसणार आहे, “एक गोष्ट मला सांगायची आहे. I really like your courage. खरंच appreciate करते मी. हे सगळे तुझ्याविरुध्द्व असले तरीदेखील. पण काय होणार, या गोष्टीमुळे तू खूप impulsive दिसतेस. पुढे जेव्हा तुला स्ट्रॉंग सपोर्ट लागेल ना तेव्हा लोकं दोन तीन वेळा विचार करतील. मला माहिती आहे तुला असं वाटतं कि,कोणी तुझं ऐकत नाहीये वैगरे, पण मी तुला consider करते. पण त्याचवेळेला दुसरी बाजू इतकी स्ट्रॉंग होऊन जाते कि तुझ्या impulsivness मुळे…” रोहितचं पण म्हणणं पडलं “तू टार्गेट होते आहेस majorly” त्यावर यशश्री तिची बाजू मांडताना दिसणार आहे, “समृद्धी ज्यांना माझ्याविषयी विश्वास वाटायला पाहिजे त्यांना मी दाखवून दिले आहे.” अजून हि चर्चा किती पुढे गेली ? समृद्धीने दिलेला सल्ला यशश्रीला पटला का?

 …तर मी तुम्हांला सेफ करून स्वतः त्याग नाही करणार” – यशश्री
आज बिग बॉस मराठीच्या घरात अपूर्वा, यशश्री, त्रिशूल, समृद्धी, मेघा, अक्षय आणि रोहित यांच्यामध्ये चर्चासत्र भरणार आहे. ज्यामध्ये अपूर्वा, यशश्री आणि समृद्धी आपआपले मुद्दे मांडताना दिसणार आहेत. अपूर्वाचे म्हणणे आहे, “आपल्याकडे चॉइसेस आहेत टीम बनवण्याचे तर मला असं वाटतं यशश्री, मी आणि मेघाताई यांना खेळण्याचे प्राधान्य दिले पाहिजे. कारण आम्हाला आमच्या प्रेक्षकांना कारण आम्ही तिथे (नॉमिनेशनमध्ये) डिसर्व्हचं करत नाही. आम्ही तिघेही चर्चतलेच विषय होतो कायम समृद्धीचे म्हणणे आहे,

कॅप्टन्सीचे काही असेल ना तर मी खेळणार, कारण मला खरंच खेळायचं आहे. त्यावर यशश्री म्हणाली, “आपणं आपलं पर्सनल लेव्हलला खेळूया, ग्रुपचा टास्क असेल तेव्हा ग्रुप बरोबर खेळूया. कारण, आपण धरून चालूया जर माझ्याकडे तुमच्या दोघींची (मेघा ताई आणि अपूर्वा) बॅग असेल तर मी तुम्हांला सेफ करून स्वतः त्याग नाही करणार हे माझं खूप क्लिअर आहे आणि तुमचं देखील तसंच असायला हवं असं मला वाटतं.”

अजून घरात काय काय घडले हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!