‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज होणार मिड वीक एव्हिक्शन; कोणाचा प्रवास संपणार?

0

मुंबई,दि,३ ऑक्टोबर २०२४ –‘बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi )चा खेळ आता अंतिम टप्प्यावर आला आहे. लवकरच हा खेळ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात वेगवेगळे धमाके घडत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात पहिल्यांदाच अनेक गोष्टी या पर्वात घडत आहेत. अशातच आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात मिड वीक एव्हिक्शन होणार आहे.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे. प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”संपूर्ण सीझनमध्ये, सगळ्यात कठीण आणि त्रासदायक असतं हे मिड वीक एव्हिक्शन…आणि आज या मिड वीक एव्हिक्शनमध्ये घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचे नाव आहे….”.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील आज कोणाचा प्रवास संपणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता प्रभू – वालावलकर , धनंजय पोवार आणि सूरज चव्हाण यांच्यापैकी एकाचा प्रवास आज संपलेला पाहायला मिळेल.

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा ..  फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा 
उद्या शुक्रवार दि, ४ ऑक्टोबर 
उद्याचा रंग- हिरवा 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!