कॅप्टनसी टास्कमध्ये निक्की झाली हतबल;काय असेल तिची पुढची खेळी ?

"दम असेल तर मला बाहेर काढून दाखव";जान्हवीचं निक्कीला चॅलेंज

0

मुंबई,दि,१३ सप्टेंबर २०२४ -‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकताच पार पडलेला कॅप्टनसी टास्क सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. एकीकडे आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली आहे. तर दुसरीकडे कॅप्टन न होता आल्याने निक्की हतबल झाली आहे. हतबल झालेल्या निक्कीवर ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य चर्चा करताना दिसणार आहेत.

जान्हवी म्हणतेय,”मला ट्रॉफी मिळो किंवा नको मिळूदेत पण मला निक्कीचा गर्व उतरवायचा आहे”. त्यावर पॅडी दादा म्हणतात,”तिचा गर्व उतरलाय.. हतबल झाली आहे ती आता”. अंकिता म्हणतेय,”आम्ही तिला सांगत होतो फुटेज देऊ नको आम्हाला तू बाहेर जा”.

अरबाजने केलाय जान्हवीचा गेम
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात जान्हवी आणि अभिजीत अरबाजबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. जान्हवी म्हणतेय,”अरबाजला मला काहीतरी मोठं काम द्यायचं होतं. माझी टीम जर तयार असेल तर मी करेल असं मी त्याला म्हणाले होते”. “मागच्या आठवड्यात तिकडे सुरू होतं ते आता तुझ्यासोबत सुरू आहे”. जान्हवी म्हणते,”करुदेत..माझ्याकडे सगळ्याची उत्तरं आहेत. कॅप्टनसी पदाच्या उमेदवारीतून मला काढण्यात आलंय. मी त्याला का आता सेफ करावं”.

“दम असेल तर मला बाहेर काढून दाखव”; जान्हवीचं निक्कीला चॅलेंज
‘बिग बॉस मराठी’ची सध्या तुफान चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात कधी काय होईल याचा काही अंदाज नाही. या घरातील सदस्यांची नात्याची समीकरणं ही नेहमी बदलताना दिसतात. निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकरची घट्ट मैत्री सुरुवातीचे काही दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पण नंतर त्यांच्या मैत्रीत फूट पडली. आता त्यांच्यात जोरदार वादावादी झालेली पाहायला मिळणार आहे.

कॅप्टनसीवरुन निक्की आणि जान्हवीमध्ये जोरदार भडका उडाला आहे. दोघी एकमेकांना चॅलेंज देताना आजच्या भागात दिसतील. समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी निक्कीला म्हणतेय,”दम असेल तर मला बाहेर काढून दाखव..चॅलेंज आहे”. त्यावर निक्की म्हणते,”कॅप्टनसीमधून तिला काढलं याचा राग आलाय तिला”. जान्हवी पुढे म्हणते,”या घरात सगळ्यांना तू घाण झाली आहेस”.

अरबाज आणि वैभव करतायत जान्हवीबद्दल चर्चावैभवला अरबाज म्हणतोय,”आता तू माझं दुसरं रूप बघशील. जान्हवीने माझ्यावर आरडाओरडी केली. टास्कदरम्यान तिने मला खूप इरिटेड केलं आहे. मला खूप काही बोलली. जान्हवी आपल्यासाठी खेळतेय हे माझ्या मनात आलं नाही”. वैभव पुढे अरबाजला सांगतो जान्हवीने माझ्यासाठी खेळण्याला होकार दिला होता. अरबाज पुढे म्हणतो,”वैभवला उडवायचं असं ती सगळ्यांना म्हणाली होती”.

मागच्या आठवड्यात तिकडे सुरू होतं ते आता तुझ्यासोबत सुरू आहे”. जान्हवी म्हणते,”करुदेत..माझ्याकडे सगळ्याची उत्तरं आहेत. कॅप्टनसी पदाच्या उमेदवारी तून मला काढण्यात आलंय. मी त्याला का आता सेफ करावं”.

“मी एकदम साधा माणूस, पण राग आला तर…”;गोलीगत सूरज चव्हाण म्हणतोय…
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील गोलीगत सूरज चव्हाणने अल्पावधीतच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आजच्या भागात सूरज पॅडी दादा आणि अंकितासोबत गप्पा मारताना दिसून येणार आहे. दरम्यान सूरज म्हणतोय,”गाव म्हत्त्वाचं आहे मला. कधी गावाकडे जातोय आणि सर्वांना भेटतोय असं मला झालंय. इथे नुसता आरडाओरडा सुरू असतो”. त्यावर अंकिता म्हणते,”आपल्या भावनांवर कंट्रोल करणं गरजेचं आहे”. सूरज पुढे म्हणतो,”मी एकदम साधा माणूस आहे. पण राग आला तर मी पुढचं मागचं बघत नाही. इथे मी स्वत:ला खूप कंट्रोल केलंय”. त्यानंतर सूरज पॅडी दादांची मसाज करताना दिसून येतो. सूरजचा मसाज पाहून पॅडी दादा म्हणतात,”तुला मसाज काय असतो तेच दाखवतो”. ‘बिग बॉस’च्या घरात न बोलणारा सूरज चव्हाण आता हळूहळू बोलायला लागलेला आहे.

आर्याच्या दर्दी शायरीला मिळाली सगळ्यांकडून दाद 
आजच्या ‘UNSEEN UNDEKHA’ मध्ये तुम्ही पाहू शकता , टीम ‘B’ पॅडी दादा अभिजित , सूरज, अंकिता हे गार्डन एरियात बसले असताना आर्याने त्यांच्या समोर एक खास शायरी ऐकवली. आर्या म्हणाली, “मेरे लिये मोह्हबत कम्बख़त तू है बस मे सिधी सादि सी कम्बख़त तू है बस. जो मे मर जाऊ कोई खोलके देखे दिल मेरा. कल भी तू हि मिलेगा और आज भी कम्बख़त तू है बस.असे या शायरीचे बोल आहे. ही शायरी ऐकून पॅडी दादा, अभिजीतने आर्याचे कौतुक करत वाह वाह केले. पुढे पॅडी दादा आर्याला म्हणाले,” तू ही शायरी मला नंतर व्हाट्सअप कर.”

मेरे एक पलक पर अश्क है, तो दुसरे पर खुदा…..आर्याची केली शब्दांची जादू
‘बिग बॉस मराठी’च्या घरात वेगळ्या पैलूचे सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक सदस्यांमध्ये काहीतरी खास बाब असल्याचे दिसत असून तीच  गोष्ट प्रेक्षकांना आवडत आहे.

आजच्या ‘UNSEEN UNDEKHA’ मध्ये तुम्ही पाहू शकता, पॅडी दादा अभिजित, सुरज अंकिता आणि वैभव हे  बेडरूम एरियात बसले असताना आर्याने त्याच्या समोर एक खास शायरी  त्यांना ऐकवली. आर्य म्हणाली.” मेरे एक पलक पर अश्क है, तो दुसरे पर खुदा. तिसरे पर वफा और चौथे पर दिल रुबा”

‘UNSEEN UNDEKHA’ मध्ये तुम्ही आर्याने केलेली खास शायरी ऐकू शकता. महाराष्ट्रात नाही तर बिग बॉसच्या घरात देखील आर्याच्या शब्दांच्या जादू चालत असून त्याने रसिकांचे मनोरंजन देखील होत आहे.

“कॅप्टनशिप टास्कमध्ये सगळ्यात शेवट पर्यंत ताई असतात..” DP दादांनी मांडले मत 
‘बिग बॉस’ मराठीच्या आजच्या ‘UNSEEN UNDEKHA’ मध्ये तुम्ही पाहू शकता,DP दादा, वैभव, अंकिता , वर्षा ताई, अभिजित, पॅडी दादा , सुरज आणि आर्या हे बेडरूम एरियात एकत्र बसले  असताना DP दादा सगळ्यांना म्हणाले, “वर्षा ताईने दुपारी आमची भारी मज्जा केली होती. मी वैभव आणि अरबाज आम्ही तिघे बोलत थांबलो होतो. ताई वॉशरूम मधून बाहेर आल्या आणि म्हणाल्या,” स्टॅटर्जी काही बदल आहे का?” तर आम्ही त्यांना नाही म्हणालो. मग त्या  पुढे गेल्या.

त्यावर वर्षा ताई म्हणाल्या, ” हो बरोबर आहे. मला काय करायचे आहे. तेवढे फक्त सांगा. यावर DP दादा म्हणाले,” त्यांना इच्छा वैगरे काही नसते. पण कॅप्टनशिप टास्कमध्ये सगळ्यांत पुढे ताई असतात.”

‘UNSEEN UNDEKHA’ मध्ये तुम्ही पाहू शकता, DP दादांनी कशी केली वर्षा ताईंची थट्टा. पाहा बिग बॉस मराठी.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना बिग बॉसने करुन दिली ‘या’ गोष्टीची जाणीव
‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच वेगवेगळी नाटकं पाहायला मिळतात. आता घरातील काही सदस्यांनी अन्नाची नासाडी केल्याने बिग बॉसने त्यांना उकडलेलं अन्न खाण्याची शिक्षा दिली आहे. अन्न ही मूलभूत गरज आहे. पण आजही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पुरेसं अन्न न मिळाल्याने लोकांना फक्त पाणी पिऊन झोपावं लागतं. पण बिग बॉसच्या घरातील काही सदस्य मात्र अन्न वाया घालवताना दिसून आले आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये अंकिता म्हणतेय,”भूक लागली आहे बिग बॉस”. त्यानंतर बिग बॉस म्हणत आहेत,”आज महाराष्ट्रात एक वेळच्या अन्नासाठीदेखील चूल पेटणं शक्य होत नाही. या परिस्थितीची झलक मिळावी म्हणून आपण केवळ उकडलेलं अन्न खा”. पुढे पॅडी दादा म्हणतोय,”उकडलेल्या अन्नाचं इटकं वाटलं नव्हतं बिग बॉस बोलल्यानंतर ते जास्त जाणवतय”.

अन्न वाया घालवणाऱ्या सदस्यांना किती दिवस फक्त उकडलेलं अन्न खावं लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बिग बॉस मराठीचा आजचा भाग खूप खास असणार आहे. आजच्या भागात प्रेक्षकांना अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.