मुंबई,दि,२४ ऑगस्ट २०२४-‘बिग बॉस मराठी’चा चौथा आठवडा खूपच धमाकेदार होता. घरातील सदस्यांमध्ये वाद, रडारडी, भांडणं, पाहायला मिळाली. घरातील काही सदस्यांचं खूप कौतुक झालं तर काहींना मात्र नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं. आठवडाभरात सदस्यांनी केलेल्या राड्यावर रितेश भाऊ आता सदस्यांची शाळा घेताना दिसून येणार आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात नॉमिनेशनची चूल पेटली आणि हाऊसफूल एन्टरटेनमेंट झालं. कोणी कोणाला धूळ चारली तर कोणाची बत्ती गूल झाली. आता आठवड्याभरातील या सर्व गोष्टींवर चर्चा करुन रितेश भाऊ सदस्यांना जोरदार भाऊचा धक्का द्यायला आता सज्ज आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात सत्याचा पंचनामा झाला, नॉमिनेशची चूल पेटली. अशा अनेक गोष्टींदरम्यान घरातील सदस्यांनी हा आठवडा चांगलाच गाजवला आहे. काहींकडून गंभीर चूका झाल्या असून सदस्यांना रितेश भाऊ आता या चूका दाखवून देणार आहे.