बिग बॉस मराठीच्या घरातून राधा पाटीलची EXIT!

0

मुंबई | २५ जानेवारी २०२६- Bigg Boss Marathi Season6 कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ मध्ये या आठवड्याचा ‘भाऊचा धक्का’ प्रेक्षकांसाठी अत्यंत निर्णायक ठरला. दणक्यात झालेल्या बाप्पाच्या आगमनानंतर सूत्रसंचालक रितेश देशमुख यांचा ठाम, शिस्तप्रिय अवतार पाहायला मिळाला आणि त्याचवेळी घरातून पहिल्या सदस्याची EXIT जाहीर झाली.
पहिल्या आठवड्यात कोणतीही हकालपट्टी न झाल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर जाणारी पहिली सदस्य ठरली राधा पाटील. तिच्या एक्झिटमुळे घरातील समीकरणं पूर्णपणे बदलणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, भाऊच्या धक्क्यावर प्राजक्तावर दादागिरी करणाऱ्या अनुश्रीला रितेश भाऊंचा जबरदस्त शब्दिक दणका बसला.(Bigg Boss Marathi Season6)
“भावाला आणलाय? सांगा आता काय सांगणार… हे बिग बॉसचं घर आहे, इथे मस्ती नाही तर शिस्त चालते!”
हा संवाद ऐकून घरातील सदस्य अक्षरशः गप्प झाले.
गेल्या आठवड्यात घरात आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक वाद, नियमभंग आणि ढासळणारी नाती यामुळे तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. काहींची मैत्री घट्ट झाली, तर काही नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला. मात्र राकेश बापटने साकारलेल्या बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन आणि प्राजक्ताचं भावस्पर्शी भजन यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं.

याच एपिसोडमध्ये
“जेव्हा मिळणार chance, तेव्हा भाऊच्या धक्क्यावर होणार dance!”
अशा हलक्याफुलक्या क्षणांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली.

राधा पाटीलच्या एक्झिटनंतर घरातील खेळ कसा वळण घेणार? पुढच्या आठवड्यात कोण ठरणार कॅप्टन, कोण होणार नॉमिनेट आणि कोणाला मिळणार शाबासकी?
हे सगळं पाहण्यासाठी पाहत राहा—

📺 बिग बॉस मराठी सिझन ६
🕗 दररोज रात्री ८ वाजता
📍 फक्त कलर्स मराठी आणि कधीही @JioHotstar वर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!