मुंबई १० ऑक्टोबर,२०२२ – बिग बॉस मराठी सिझन चौथा सुरु झाल्यापासून एका गोष्टीची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते, आणि ज्याबद्दल बऱ्याच चर्च रंगल्या ती म्हणजे, बिग बॉस चावडी यावर्षी होणार ? महेश मांजरेकर सदस्यांची शाळा घेणार कि नाही ?. यावर्षी चावडी चांगलीच रंगली. महेश सरांनी सदस्यांची शाळा घेतली, सदस्यांची कानउघाडणी केली तर सदस्यांना कुठे ते चुकतं आहे सांगितले, काहींचे कौतुक केले. काल सदस्यांना सुखद धक्का मिळाला कारण कुठलाही सदस्य घराबाहेर पडला नाही… आज सदस्यांना मिळणार आहे सरप्राईझ ! घरामध्ये येणार आहे सुपरहिरो… कोण असेल हा सुपरहिरो ? आज कळेलच.
बिग बॉसनी जाहीर केले कि, “घरात भेटीला येणार आहे एक सुपरहिरो. सुपरहिरोच्या स्वागतासाठी आपणा सर्वांकडे तयार होण्यासाठी वेळ आहे ४५ मिनिटं” या घोषणेनंतर घरातील सदस्यांची तारांबळ उडाली. सदस्यांची सुरु झाली धावपळ… बघूया कोण आहे हा सुपरहिरो ? आणि यांच्या येण्याने घरामध्ये काय घडेल? बघूया आजच्या भागात.
माझं नावं कानफाट्या ठेवा आता – अपूर्वा !
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भांडणासोबतच आज जरा मज्जा मस्ती देखील बघायला मिळणार आहे. आज डायनिंग टेबलवर भांडण नाही तर सदस्य हसताना दिसणार आहेत. कोण आहे कानफाट्या ? अपूर्वा का म्हणते आहे माझं नावं कानफाट्या ठेवा आता … झालं असं रोहितने समृद्धीला विचारले तुझा आज बुबू बघितला नाही… त्यावर समृद्धीचे म्हणणे पडले, त्याला बरं नाही वाटतं आहे झोपला आहे त्याला अपूर्वाची नजर लागली आहे, सारखी चिमटे काढत असते त्याला. त्यावर अपूर्वा म्हणाली, “झालं त्याला पण माझीच नजर लागली. कानफाट्या नावं ठेवलं आहे माझं. तिथल्या नेमप्लेट वरील माझं नावं बदलून कानफाट्या ठेवा. काही झालं तरी घुमून फिरून माझ्यावरचं येते आहे”
बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.