“या दोघांचे काहीच होणार नाहीये ते तसेच राहणार आहेत…”-तेजस्विनी
मुंबई २४ ऑक्टोबर, २०२२ – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तेजस्विनीचा ग्रुप आज दुसऱ्या ग्रुपबद्दल चर्चा करताना दिसणार आहे. ज्यामध्ये तेजस्विनी तिच्या टीमला सावध करणार आहे. काल मेघा घाडगे यांना घराबाहेर पडावे लागले आणि त्यामुळे घरातील दुसऱ्या ग्रुपची समीकरणं तेजस्विनीला बदलताना दिसत आहेत, ज्याबद्दल ती ग्रुपला सल्ला देणार आहे. विशेषतः योगेशला. तेजस्विनी सांगताना दिसणार आहे, “आता काय झालं आहे काल जे झालं त्यानंतर लगेच सगळे नीट बोलत आहेत. मला काही प्रॉब्लेम नाहीये मी तर तशीही पहिल्या दिवसापासून सगळ्यांशी नीटच बोलते आहे इथे माझी लॉयलीटी मी दाखविली आहे. ते नीट बोले तरी भारावून जाऊ नका. फक्त काळजी घ्या, त्यांची Strength कमी होतं आहे तर त्यांना लोकं पण हवी आहेत. त्यांच्या ग्रुपमध्ये बसायला, टवाळक्या करायला. त्यात तुझा नंबर पहिला आहे (योगेश) emotionally भारावून जाण्यात तू पहिला येतोस. अमृता धोंगडे म्हणाली, त्या दोघांचे (किरण आणि विकास) म्हणणे आहे प्रसादसाठी त्यांनी आपल्याशी वैर घेतले. तेजस्विनीचे म्हणणे आहे या दोघांचे काहीच होणार नाहीये ते तसेच राहणार आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिवाळीचा जल्लोष !
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करताना दिसणार आहेत. सदस्यांनी एकत्र मिळून कंदील बनवला आहे तर घराची सजावट देखील केली. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून बिग बॉस मराठीच्या सदस्यांनी तमाम प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
बिग बॉस मराठीच्या घरामधून मेघा घाडगे बाहेर !
बिग बॉस मराठीची या आठवड्यातील चावडी चांगलीच रंगली. आरोप प्रत्यारोप तर बघायला मिळालेच पण, काही सदस्यांना आता जागं होण्याची गरज आहे असे देखील महेश मांजरेकरांनी सांगितले. तर योगेशला सक्त ताकीद मिळाली जर या पुढे कोणाचा बाप काढला तर घरामधून बाहेर काढेन. काही सदस्यांना पत्राद्वारे आपल्या व्यक्त करण्याची संधी बिग बॉस यांनी दिली. तेजस्विनीने अमृता धोंगडेसाठी तर प्रसादने योगेशसाठी पात्र लिहिले… तर अमृता देशमुखने प्रसादसाठी पत्र लिहिले तर किरण माने यांनी विकासाठी. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT चुगली बूथद्वारे आलेल्या चुगलीमुळे अपूर्वा अमृता धोंगडे वर चांगलीच भडकली, “आयुष्यात पुन्हा असं बोलीस तर खूप महागात पडेल” असे अपूर्वाने तिला बजावून सांगितले. तर दिवाळीनिमित्त काही स्पेशल भेटवस्तू सदस्यांनी एकमेकांना दिल्या. ज्यामध्ये त्रिशूलने योगेशला नारळ देऊन बाहेरचा रस्ता दाखवला, तर अपूर्व मिळाली काडेपेटी. तेजस्विनीला मिळाले रिमोट कंट्रोल.
VOOT आरोपी कोण मध्ये विकासला आरोपी ठरवले आणि शिक्षा देखील सुनावली. कारण देखील दिले का तो या आठवड्याचा आरोपी आहे, कारण किरण माने सांगतात तेच तो करतो. आणि तो क्षण आला जो कधीच येऊ नये असे घरातील प्रत्येक सदस्याला वाटत असते. मेघा घाडगे यांना घराबाहेर पडावे लागले. “अमृता देशमुख धन्यवाद मला चूक नसताना नॉमिनेट केलं… किरण माने तुमच्यामुळे मी बाहेर आले आहे. AV पहिली मी या माणसापासून सांभाळून राहा” घरच्यांना मेघा घाडगे यांनी दिला सल्ला
पुढच्या आठवड्यात कोण राहील ? कोण जाईल ? हे ठरवेल त्यांचा गेम. कोण होईल कॅप्टन ? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ ? बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.