Bigg Boss Marathi:त्याच्याशी कसेही वागा पण छोटा पुढारी मात्र सगळ्यांशी प्रेमानेच वागणार

0

मुंबई,८ ऑगस्ट २०२४ –गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची म्हणजेच घन:श्याम दरवडेची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री झाली आणि पहिल्या दिवसापासून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात छोटा पुढारी घन:श्याम दरवडेसोबत घरातील सदस्य कसेही वागत असले तरी तो त्यांच्याशी प्रेमानेच वागताना दिसत आहे.

घन:श्याम दरवडेच्या प्रत्येक स्टेटमेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो. आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणाऱ्या या पुढाऱ्याने घरातील सर्व सदस्यांनाही आपलंस केलं आहे.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये घन:श्याम इरिनाला म्हणतोय,”तू माझ्याशी कसंही वाग…पण मी तुझ्यासोबत प्रेमानेच वागणार”.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज टीव्ही टास्क पार पडणार आहे. बिग बॉस टीव्ही चॅनलवर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स सादर करताना दिसत आहेत. घन:श्याम हे सर्व परफॉर्मन्सचं परिक्षण करताना दिसणार आहे. त्यामुळे आजचा भाग खूपच रंजक असणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.