भाजपच्या ३० टक्के आमदारांचा पत्ता कट होणार : उद्या पहिली यादी जाहीर होणार

११० नावांवर शिक्कामोर्तब

0

नवी दिल्ली,दि ,१७ ऑक्टोबर २०२४ – महाराष्ट्र विधानसभेच्या जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची रणनीती जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. भाजपा आपले ३० टक्के उमेदवारही बदलणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल बुधवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली.त्यामध्ये भाजपच्या ११० जागांचा निर्णय अंतिम झाल्याची माहिती आहे. तसेच उद्या भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी (BJP List)जाहीर होणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे आहे.

काल बुधवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडली. सुमारे दोन ते अडीच तास ही बैठक सुरू होती. त्यामध्ये भाजपच्या १०५ मतदारसंघांवर आणि समर्थन देणाऱ्या इतर ११ आमदारांच्या जागांवर चर्चा झाली. त्यानंतर जवळपास ११० जागांचा निर्णय अंतिम झाल्याची माहिती आहे.

या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपचे सगळे नेते दिल्लीतून माघारी परतले.देवेंद्र फडणवीस मात्र रात्री दिल्लीतच मुक्कामी राहिले.बैठक संपल्यावर देवेंद्र फडणवीस पुन्हा रात्री उशिरा भाजप मुख्यालयात पोहचले.तेथे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाली

भाजपकडून ११० जागांवर अंतिम निर्णय झाला असून येत्या शुक्रवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे.त्यामध्ये एकूण ३० टक्के उमेदवार बदलण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.