📍 मुंबई | १९ जुलै २०२५ – BJP Maharashtra internal issues राज्यात सत्ताधारी पक्षातील वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकेला आळा घालण्यासाठी अखेर भाजपने पावले उचलली आहेत. भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षातील वाचाळ नेत्यांना थेट इशारा दिला आहे. यामध्ये खास उल्लेख नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांचा आहे.
गेल्या काही काळात या दोघा नेत्यांनी केलेली वक्तव्ये सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेली दिसली. विशेषतः शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर पडळकरांनी केलेली टीका ही अत्यंत टोकाची आणि आक्षेपार्ह होती. तर नितेश राणे हे कायमच राजकीय टीका, समाजमाध्यमांवरील वक्तव्यं आणि भाषणांमधील खवखवीत टोले यामुळे चर्चेत राहिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले की, “नेत्यांनी टीआरपीच्या स्पर्धेत उतरू नये. लोकप्रतिनिधींनी बोलताना शब्द जपून वापरावेत.” हा इशारा म्हणजे पक्षातील वाचाळवीरांना तंबीच मानली जात आहे. त्यांच्या मते, अशा वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात येते आणि विरोधकांना कुरवाळण्याची संधी मिळते.
रवींद्र चव्हाण यांनी पुढे सांगितले की, “आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत. तिघेही (भाजप, शिंदे गट, अजित गट) रक्ताच्या भावाप्रमाणे काम करत आहेत. महाराष्ट्राचे प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळले जात आहेत. राजकीय कुरघोड्यांकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे.”
त्यांनी स्पष्ट केले की पक्षात कुठलेही शीतयुद्ध नाही. “गेल्यावेळी महापालिकेत आम्ही वेगळे लढलो होतो, तरीही पुन्हा एक झालो. २०१७ मध्ये सेनेला महापौर पद दिलं होतं. पुन्हा तसं होईल का सांगता येत नाही,” असं म्हणत त्यांनी संभाव्य बदलते राजकारण सूचित केलं.
भाजपमध्ये “Boss is always right” ही संस्कृती असल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचा पुनरुच्चार केला.
ही कारवाई म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर भाजपची स्वच्छ प्रतिमा टिकवण्याचा प्रयत्न असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.(BJP Maharashtra internal issues) आता प्रदेशाध्यक्षांच्या सज्जड दमीनंतर नितेश राणे आणि पडळकर यांचा बोलण्यावर कितपत अंकुश येतो, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
[…] नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांना भा… […]