मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली आहे. २१५ कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल केलं आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसलाही या आरोपपत्रात आरोपी म्हणून ठेवण्यात आलं आहे. नुकतंच याबाबतची माहिती समोर आली आहे.
या पूर्वी जॅकलीन फर्नांडिसची दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशी झाली होती. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आलं आहे. सुकेशकडून महागडी जनावरं गिफ्ट घेणं महागात पडलं आहे. मुंबई विमानतळावर ईडीनं तिला थांबवलं होतं. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी झाली असल्याची माहिती आहे.
सुकेश चंद्रशेखर यांच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी सुरु आहे. सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीने एकूण ५ जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलं होतं. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल ५२ लाख आणि प्रत्येकी ९ लाख रुपये किंमत असलेली एकूण ३६ लाखांच्या ४ पर्शियन मांजरांचाही समावेश आहे. जॅकलीन आणि सुकेशचा एक फोटोदेखील समोर आला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर जॅकलीन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. दिल्लीच्या तिहार तुरुंगातून २०० कोटी रुपये वसूल केल्याप्रकरणी ईडीने शनिवारीच आरोपपत्र दाखल केले होते.