मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार : ट्विटरवरून आली धमकी

0

मुंबई,दि.२३ मे २०२३ –देशाची आर्थिक राजधानी मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची पुन्हा एकदा धमकी आली आहे.पण यंदा फोन किंवा ईमेलवरुन नाहीतर थेट ट्विटरवरुन   धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी तपास सुरू केला आहे.तसेच,अधिक चौकशीही सुरू करण्यात आली आहे.याप्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. ज्या ट्विटर हँडलवरून हे पोस्ट करण्यात आले आहे त्याचीही चौकशी करण्यात येत आहे.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी (२२ मे) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर “मी लवकरच मुंबईत स्फोट घडवणार आहे”असा मेसेज पाठवला होता. हा मेसेज इंग्रजी भाषेत पाठवण्यात आला होता.मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीनं मेसेजमध्ये लिहिलं होतं की,”I M Gonna Blast The Mumbai Very Soon.” हा मेसेज गांभीर्यानं घेत मुंबई पोलिसांनी संबंधित ट्विटर अकाऊंटची चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

यापूर्वीही अनेक वेळा बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती.काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.