बुस्टर डोसचे नवे नियम लागू

0

नवी दिल्ली – कोरोना लसीचा पहिला डोस ,दुसरा डोस आणि बूस्टर डोस यातील अंतर कमी करावे अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे.आता या मागणीची दखल घेत आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यासाठी हा कालावधी ९ महिन्यावरून ९० दिवसांवर करण्यात आला आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.

तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार, आता आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या गरजू व्यक्तिंना देखील बूस्टर डोस देण्यात येणार आहे. त्याप्रमाणे आंतराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरिकांना ज्या देशात जायचे आहे त्या देशातील नियमांनुसार लस देण्यात येणार आहे. परदेशी जाणाऱ्या व्यक्तिंना दुसरा डोस घेतल्याच्या ९० दिवसांनंतर तिसरा डोस म्हणजे बुस्टर डोस घेता येणार आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

कोविन अॅपमध्येदेखील बदल
कोविन अॅपसह संबंधित संगणकीय प्रणालीमध्येदेखील आवश्यक ते बदल केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या स्तरावर करण्यात आले असून बूस्टर डोससंदर्भातील सर्व मार्गदर्शक सुचनांनुसार व वैद्यकीय उपचार क्रमानुसार आवश्यक त्या बाबींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक व खासगी लसीकरण केंद्रांनी याची नोंद घ्यावी व त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात येत आहेत.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!