BSNLच्या 5G सेवेला मिळालं नवं टायटल,‘Q-5G’नावाने लवकरच होणार लॉंच

0

नवी दिल्ली, दि. १८ जून २०२५ – BSNL Q-5G Launch News भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) लवकरच आपली 5G सेवा भारतात सुरू करणार आहे. या सेवेचं नाव Q-5G ठेवण्यात आलं असून, “Q” म्हणजे Quantum असं स्पष्ट करण्यात आलं आहे. कंपनीनं सोशल मीडियावर याचे अधिकृतपणे घोषणा केली आहे.

BSNL च्या मते, ‘Q-5G’ हे नाव उच्च गती,(BSNL Q-5G Launch News) ताकद आणि भविष्यातील डिजिटल दृष्टीकोनाचं प्रतीक आहे. सध्या खासगी कंपन्या जसे की Reliance Jio आणि Bharti Airtel भारतात 5G सेवा पुरवत आहेत, त्यांना टक्कर देण्यासाठी BSNL आपल्या सेवेचं लवकरच लोकार्पण करणार आहे.

कंपनीने देशभरात 1 लाख 4G टॉवर्स आधीच बसवले असून, आणखी 1 लाख टॉवर्स बसवण्याची योजना आहे. या योजनेसाठी दूरसंचार विभाग (DoT) लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरी मागणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी जाहीर केलं.

BSNL स्थानिक पातळीवर उत्पादित उपकरणांचा वापर करत असल्याने काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, परंतु त्या लवकरच दूर केल्या जातील, असं पेम्मासानी यांनी सांगितलं. याशिवाय, BSNL आपल्या मालमत्तेचं मोनेटायझेशन करून कॅश फ्लो वाढवण्याच्या तयारीत आहे.

महत्त्वाचं म्हणजे, गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत BSNL ला २८० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. १८ वर्षांनंतर पहिल्यांदा कंपनीने सलग दोन तिमाहीत नफा मिळवला आहे. 4G सेवेमुळे BSNL चा मोबाईल विभागातील उत्पन्न वाढलं आहे.

लवकरच ‘Q-5G’ च्या माध्यमातून BSNL पुन्हा एकदा स्पर्धेत सक्रिय होण्यास सज्ज दिसत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!