जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बस दरीत कोसळली : १२ जणांचा मृत्यू

0

मुंबई,दि.१५ एप्रिल २०२३ – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एक खासगी बस ५०० फूट खोल दरीत कोसळल्याने  भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून १६ जणांना वाचवण्यात यश आले असल्याची माहिती मिळतेय.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोरघाटातील शिंगरोबा मंदिर जवळ आज(दि.१५) पहाटे चारच्या सुमारास प्रवाशी गाढ झोपेत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेत २० ते २५ जण जखमी झाले आहेत. यातील १६ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांना यश आलं असून अद्याप काही लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.

ही खासगी बस पुण्याहून मुंबईला निघाली होती. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील शिंगरोबा मंदिराच्या मागील घाटात बसचा तोल गेला आणि ही बस दरीत कोसळली. बस दरीत कोसळल्याने अचानक बस आदळली आणि बसमधील प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली.बस कोसळल्याने आवाज येताच काही प्रवासी भानावर आले. त्यामुळे या दरीतून केवळ किंचाळण्याचा आवाज येत होता. या ठिकाणी सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

Bus falls into ravine on old Pune-Mumbai highway

वाहतुकीची कोंडी
स्थानिकांनी घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांना माहिती दिली आणि मदतकार्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं. अपघातातील जखमींना बाहेर काढलं जात आहे. रात्रीचा अंधार असल्याने या बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. मात्र, उजाडताच या मदतकार्याच्या कामास वेग आला आहे. क्रेन मागवून बस बाजूला केली जात आहे. रुग्णवाहिकेतून जखमींना खोपोली नगर पालिकेच्या दवाखान्यात दाखल केलं जात आहे. तसेच अपघातामुळे या परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. या महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.

१६ प्रवासी जखमी
सध्या बसमधील १६ जखमी प्रवाश्यांना बाहेर काढलं आहे. अजूनही काही लोक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. तसेच जखमींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तसेच खासगी डॉक्टरांनाही खोपोली नगरपालिकेच्या दवाखान्यात पाचारण करण्यात आलं आहे. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!