बी वाय के कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये ‘SPPU Start Up Talk Series’उत्साहात
तरुणांना उद्योजकतेची नवी दिशा; २०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नाशिक – दि , २१ फेब्रुवारी २०२६ – BYK College of Commerce सावित्रीबाई फुले पुणे,युनिव्हर्सिटी (SPPU) संलग्न बी.वाय.के. कॉलेज ऑफ कॉमर्सच्या इनोव्हेशन अँड स्टार्टअप सेलच्या वतीने १६ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘एसपीपीयू स्टार्टअप टॉक सिरीज – तरुण उद्योजकांशी संभाषण’ या विषयावर प्रेरणादायी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या Centre for Innovation Incubation and Entrepreneurship (CIIE) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. एम. आर. ढेकणे हॉल येथे पार पडला.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, नवोपक्रम आणि स्टार्टअप संधींबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. आजच्या बदलत्या आर्थिक आणि तांत्रिक वातावरणात पारंपरिक नोकरीच्या चौकटीबाहेर विचार करण्याची गरज अधोरेखित करत विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
इनोव्हेशन अँड स्टार्टअप सेलच्या प्रमुख डॉ. कांचन निकम यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवण्यावर न थांबता नवकल्पना आणि उद्योगाच्या संधी शोधल्या पाहिजेत.” प्राचार्य डॉ. लीना भट यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत स्टार्टअप संस्कृती ही काळाची गरज असल्याचे नमूद केले.
(BYK College of Commerce ) पहिल्या सत्रात नाशिक येथील टेक्नोकॅडचे संस्थापक आणि सीईओ डॉ. सतीश जे. मणियार यांनी “इनोव्हेटिव्ह माइंडसेट अँड एक्सपिरिशियल लर्निंग” या विषयावर मार्गदर्शन केले,तर दुसऱ्या सत्रात सी. इंजि. श्रीकांत पाटील यांनी “स्टार्टअप जागरूकता, नेटवर्किंग आणि भांडवल उभारणी” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी स्टार्टअप इकोसिस्टमची रचना, सरकारी योजना, गुंतवणूकदारांशी संवाद साधण्याची पद्धत आणि नेटवर्किंगचे महत्त्व स्पष्ट केले. “योग्य नेटवर्किंग आणि विश्वासार्ह सादरीकरणामुळेच स्टार्टअपला निधी मिळतो,” असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधी ओळखून त्यांचा योग्य उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टार्टअप सेलचे सदस्य डॉ. रोहिणी पाचोरे, डॉ. विनिता कुलकर्णी, डॉ. दिशा राव, डॉ. सोनाली लिमये, श्री. प्रसाद पाटील, श्री. अंकुश कापडणे आणि श्री. आदित्य घरटे यांनी परिश्रम घेतले. सुमारे २०० विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
चर्चासत्र माहितीपूर्ण आणि दिशादर्शक ठरले. विद्यार्थ्यांनी उद्योजकता हा एक व्यवहार्य आणि प्रतिष्ठित करिअर पर्याय म्हणून विचार करण्यास सुरुवात केली. कार्यक्रमाचा सार असा होता की, “उद्योजकता शिकवली जात नाही; ती योग्य मार्गदर्शन, निरीक्षण आणि सातत्यपूर्ण सरावातून विकसित होते.”

