शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

0

मुंबई – गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण राज्याला प्रतीक्षित असलेल्या शिंदे गट आणि भाजपचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला.भाजपकडून दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून मात्र ठाकरे पॅटर्न राबवण्यात आला असून ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातीलच अनेक नेत्यांना संधी देण्यात आली आहे. फक्त तानाजी सावंत हे एक नाव शिंदेंच्या मंत्रिमंडळात नवीन आहे. इतर सर्व हे ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. आज एकूण १८ जण मंत्रिपदाची शपथ घेतली.मात्र मंत्री मंडळात महिलांना आणि अपक्षांना संधी दिली नसल्याने अनेक जण नाराज असल्याचे समजते आहे.

दुसऱ्या टप्प्यात २० ते २२ जणांना संधी देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.भाजप कडून ९ दिग्गजांना संधी देण्यात आली तर शिंदे गटा कडून ९ जणांना संधी देण्यात आली भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन, नंदुरबारमधील भाजप नेते विजयकुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

तर शिंदे गटाकडून पहिली शपथ ही आमदार गुलाबराव पाटील यांनी घेतली. त्यानंतर मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार दादा भुसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

न्यायलयात सुनावणी सुरू असल्याने, तसेच काही खात्यांचा तिढा सुटत नसल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला होता. शिंदे गटाला गृहखाते हवे होते. पण, भाजप गृहखात्यासाठी अडून बसला होता. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटत नव्हता. अखेर शिंदे यांनी दोन पावले मागे जात भाजपला गृहखाते आणि अर्थखाते दिल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला असल्याचे समजते.

शिंदे गटाचे मंत्री
संदिपान भूमरे
तानाजी सावंत
गुलाबराव पाटील
दीपक केसरकर
शंभुराजे देसाई
दादा भुसे
उदय सामंत
अब्दुल सत्तार
संजय राठोड

भाजपाचे मंत्री
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
राधाकृष्ण विखे पाटील
सुरेश खाडे
रविंद्र चव्हाण
विजयकुमार गावित
अतुल सावे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.