मोठा भूकंप २ तास अगोदर ओळखता येणार ? काय आहे शास्त्रज्ञांचा दावा !

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जीपीएस डेटाचा वापर फॉल्ट स्लिपची सुरुवात मोजण्यासाठी केला जाऊ शकतो.

0

भूकंप ही अशी आपत्ती आहे की, ती आधी ओळखली तर हजारो-लाखो जीव वाचू शकतात. फेब्रुवारीमध्ये तुर्कस्तान-सीरियातील भूकंप कोण विसरू शकेल? तेथील काही भागात झालेल्या ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपात ६० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक आठवडे लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा अंदाज वर्तवण्याची सध्या जगात कोणतीही पद्धत नाही. भूकंपाचा इशारा २ तास अगोदर दिला गेला तर?

सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, फ्रेंच शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की त्यांना भूकंपाचा इशारा देण्याचा मार्ग सापडला आहे. त्यांनी कोणतेही नवीन तंत्रज्ञान शोधलेले नाही. जीपीएस प्रणालीच्या मदतीने भूकंपाचा इशारा दिला जाऊ शकतो, असा दावा शास्त्रज्ञां कडून करण्यात आला आहे.

GPS, ज्याला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम असेही म्हणतात, ही डझनभर उपग्रहांची मालिका आहे. याचा उपयोग लष्करी गरजांसाठी तसेच लोकांचे स्थान जाणून घेण्यासाठी केला जातो. जगभरातील ७ पेक्षा जास्त तीव्रतेच्या ९० मोठ्या भूकंपानंतर शास्त्रज्ञांनी जमिनीतील बदलांचे मूल्यांकन केले. त्यामुळे त्यांना आवश्यक माहिती मिळाली आहे.

शास्त्रज्ञ म्हणतात की जीपीएस डेटाचा वापर फॉल्ट स्लिपची सुरुवात मोजण्यासाठी केला जाऊ शकतो ज्यामुळे पहिल्या भूकंपाच्या धक्क्यापूर्वी २ तासांपर्यंत.इशारा मिळू शकतो .

हे शक्य झाले तर २ तासांचा वेळ खूप मोलाचा ठरू शकतो. हजारो जीव वाचू शकतात. लोक त्यांच्यासोबत जीवनावश्यक वस्तू घेऊन जाऊ शकतात. तथापि, भूकंप ओळखण्यासाठी जीपीएस डेटा ही स्पष्ट चाचणी नाही, असे अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे. हे फक्त काही नमुने दाखवते जे भूकंपाशी संबंधित आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.