केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आ.नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

दिशा सालियानबाबतच्या ‘त्या’ विधानामुळे आले अडचणीत !

0

मुंबई – दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी राणे पिता-पुत्राविरोधा पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर मालवणी पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आ.नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सालियन कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती,असा दावा गेल्या आठवड्यात नारायण राणेंनी केला होता. याप्रकरणी सालियन कुटुंबीयांनी राणेंकडून दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप केला होता.

पोलिसांनी दिलेल्या अहवालात दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टममध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ती गरोदर नव्हती असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी महिला आयोगाला यासंदर्भात अहवाल दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात लाखोंच्या संख्येने निर्माण करण्यात आलेल्या बोगस ट्विटर हॅण्डलची देखील चौकशी होणार असल्याची समजते आहे.

दिशा सलियन प्रकरणात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून भाजप नेते नारायण राणे असंवेदनशील राजकारण करून दिशा सालियन यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. तसेच महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या काही सदस्या दिशा सालियनच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी तिच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी सालियनच्या पालकांनी देखील राजकीय स्वार्थासाठी आमच्या मुलीची नाहक बदनामी केली जातेय असा आरोप करत महिला आयोगाकडे तक्रार केली होती.त्यानंतर आता सालियन कुटुंबीयांनी पोलिसांत राणे पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.