राज्यात पुन्हा इंधन टंचाईची शक्यता ?:मनमाडमधील पेट्रोल-डिझेल टँकर चालक पुन्हा संपावर

0

मनमाड,दि,१० जानेवारी २०२४ – नवीन वाहन कायदा रद्द करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल टँकर चालक संपाचा मार्ग अवलंबला आहे.टँकर चालकांनी ‘स्टिअरिंग छोडो’ आंदोलनाची घोषणा करत संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे मनमाडच्या इंधन प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा ठप्प होणार असल्याची शक्यता आहेत. तसेच, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व खांदेशचा इंधन पुरवठा ठप्प होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाची जबाबदारी घेण्यासाठी कोणेही तयार नसल्याचे देखील बोलले जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील मनमाडमधून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व खांदेशमधील जिल्ह्यांना इंधन पुरवठा केला जातो. त्यामुळे मनमाड येथील इंधन प्रकल्पातील इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालक यांनी पुकारलेल्या संपानंतर याचे परिणाम जवळपास महाराष्ट्रातील बहुतांश पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्तकेली जात आहे.

ट्रक चालक पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची एक ऑडीओ क्लिप मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिक इंधन भरण्यासाठी पेट्रोल-पंपावर गर्दी करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे कृत्रिम इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे अद्यापही कुठेही इंधन टंचाई नसल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नयेत असेही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

व्हिडीओ बघा

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.