चंद्रा तलवारे यांना अमेरिकन ईस्ट कोस्ट युनिवर्सिटीची डॉक्टर ऑफ लिटरेचरची पदवी प्रदान

0

नाशिक,दि.२ ऑगस्ट २०२३ –नाशिकच्या चंद्रा तलवारे यांना अमेरिकन ईस्ट कोस्ट युनिवर्सिटी ने नुकतीच डॉक्टर ऑफ लिटरेचर ची पदवी दिली आहे.आजपावेतो त्यांनी वृत्तपत्र व मासिकांसाठी अनेक लघुकथा कविता व आर्टिकल लिहिली आहेत. तसेच त्यांनी रंगमंचासाठी नाटक व चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या आहेत.त्याच बरोबर त्या कवयित्री व गीतकार देखील आहेत.२०२३ मध्ये चंद्रा तलवारे यांची तीन पुस्तकं लवकरच मार्केट मध्ये येत आहेत.

जगातील सर्वात मोठया साहित्यिक फेस्टिवल ‘जयपुर लिटरेचर फेस्टिवल’ मध्ये नाशिकच्या लेखिका चंद्रा तलवारे यांच्या कादंबरी ‘अलिदा’ चे प्रकाशन गणतंत्र दिवस 26 जानेवरीला जयपुर बुकमार्क तर्फे करण्यात आले. जयपुर बुकमार्क तर्फे असा मान मिळणा-या त्या पहिल्या मराठी महिला आहेत व त्या आपल्या नाशिकच्या आहेत ही नाशिक साठी गौरवाची बाब आहे.

1.बीईंग पेशंट 2. थोडा तरी विचार करा 3.द सुसाईड दॅट बॉस नॉट ‘बीइंग पेशंट’हे पुस्तक रुग्नाला निरोगी होण्यासाठी रोगाचा समर्थपणे सामना कसा करता येईल याचे मोलाचे मार्गदर्शन करते. योग्य डॉक्टर ची निवड कशी करावी पासून डॉक्टर कडे जाण्या अगोदर रुग्नाणे काय विचारायचे आहे व काय सांगायचे आहे यावर सविस्तर माहिती येथे मिळते. मुळात आजारी पडूच नये यासाठी घ्यावी लागणारी खबरदारी कशी घ्यावी व आजारी पडल्यावर लवकरात लवकर निरोगी होण्यासाठी लागणारी मानसिकता कशी जोपासावी याची माहिती पुस्तकातून मिळते.डॉक्टर कोणत्या टेस्ट कशासाठी करायला सांगू शकतात आणि आपले टेस्ट रिपोर्ट आपल्याला कशे समजू शकतील हे या तसेच पुस्तकातून दिलेल्या माहितीवरून लक्षात येते. तसेच हे पुस्तक डॉक्टर व रुग्न यांच्या दोन्ही बाजू मांडून भूमिका सुस्पष्ट करत सद्य परिस्थितित यांच्यात वाढत असलेली दरी दूर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

‘थोडा तरी विचार करा’ हा मराठी कवितांचा लघु संग्रह आपल्याला मानवी सुखसोयींसाठी केलेल्या काही कृतींचा पर्यावरणावर काय परिणाम होतो हे सांगून प्रदूषणाच्या दुष्परिणामांचा सखोल विचार करायला लावतो. आपण अजून ही सावध होऊन वेळ हातातून निघूण जाण्या आधि बदल करणे किती अपरिहार्य आहे यावर या कविता भर देतात.’द सुसाईड दॅट बॉस नॉट’ही इंग्लिश कादंबरी ‘अलिदा’ चा प्रिक्वेल आहे. कथा व कथेतील पात्र काल्पनिक असलेली ही कादंबरी अलिदा प्रमाणेच मुंबई शहराची पार्श्वभूमी असलेली एक रहस्य कथा आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!