नाशिक शहरात पंधरा ठिकाणी बसविण्यात येणार चार्जिंग स्टेशन

खासदार हेमंत गोडसे यांची माहिती

0

नाशिक,२१ सप्टेंबर २०२२ – शहर प्रदूषणमुक्त आणि इंधन मुक्त व्हावे यासाठी सुरू असलेल्या खा.गोडसे यांच्या प्रयत्नांना आता यश येवू लागले आहे. खा. गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दिल्ली येथील युएनडीपी कंपनी प्रशासनाने शहरातील पंधरा ठिकाणी चार्जिंग स्टेशन बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.चार्जिंग स्टेशनसाठी महानगरपालिका प्रशासनाने पंधरा लोकेशन निश्चित केले असून त्याचा प्रस्ताव यूएनडीपी कंपनी प्रशासनाला पाठविला आहे. शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशनची उभारणी झाल्यावर इंधन वापरात मोठी कापत होऊन शहर प्रदूषण मुक्त होण्यास मदत होणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.

नाशिक शहर स्मार्ट शहर म्हणून उदयास येणार असल्याचा गाजावाजा सध्या सर्वत्र सुरू आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरात विविध विकासकामे सुरू आहेत.असे असले तरी शहर प्रदूषण मुक्त व्हावे यासाठीही उपाययोजना करण्यात याव्यात अशी आग्रही मागणी शहरातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून खासदार गोडसे यांच्याकडे सतत होत होती. यातूनच काही महिन्यांपूर्वी खा. गोडसे यांनी युएनडीपी कंपनी प्रशासनाशी संपर्क साधून शहरात चार्जिंग स्टेशन उभारण्याकामी आपल्या कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

शहरे प्रदूषण मुक्त होणे गरजेचे असल्याच्या दृष्टीकोनातून खासदार हेमंत गोडसे यांनी निधी उपलब्धेतेची केलेली मागणी कंपनी प्रशासनाला न्यायिक वाटली आहे.यातूनच यूएनडीपी कंपनी प्रशासनाने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून शहरात चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. याविषयीचे पत्र यूएनडीपी कंपनीने मागील आठवड्यात नाशिक महानगरपालिका प्रशासनाला पाठविले होते. युएनडिपी ने पाठवलेल्या पत्राची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने शहरात पंधरा ठिकाणी चार्जिंग स्टेशनच्या लोकेशनचा प्रस्ताव आज यूएनडीपी कंपनी प्रशासनाला पाठविला आहे. यामध्ये मनपा राजीव गांधी भवन,मनपा पूर्व,पश्चिम नवीन, नाशिकरोड,सातपूर, पंचवटी विभागीय कार्यालये, बिटको हॉस्पिटल,झाकीर हुसेन हॉस्पिटल,महाकवी कालिदास कला मंदिरासमोरील पार्किंग, इच्छामणी मंगल कार्यालय, बोधले नगर, लेखानगर , गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यान, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक या लोकेशनचा समावेश आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!