ज्ञानाचा उत्सव! मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त वाचन संस्कृतीला नवी दिशा

0

नाशिक, दि. १३ ऑक्टोबर २०२५ Chhagan Bhujbal birthday राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस यंदा एका वेगळ्याच उपक्रमाने साजरा होणार आहे. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी ७९ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने “ज्ञानाच्या भेटीचा उत्सव” या अनोख्या संकल्पनेद्वारे वाचन संस्कृतीला नवे बळ दिले जाणार आहे.

भुजबळ फार्म, नाशिक येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत शुभेच्छुक आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन भुजबळ शुभेच्छा स्वीकारतील. मात्र यंदा फुलांचे गुच्छ, शाल किंवा भेटवस्तूऐवजी “पुस्तक भेट” देण्याचे आवाहन त्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे. या उपक्रमातून जमा होणारी सर्व पुस्तके ग्रामीण भागातील वाचनालयांना भेट देण्यात येणार आहेत.

मागील आठवड्यातच माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या वेळी याच संकल्पनेतून शेकडो पुस्तके जमा झाली होती. त्या अनुभवावर आधारित हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवला जाणार असून, समाजातील वाचनप्रिय घटकांना एकत्र आणणारा हा प्रयत्न ठरणार आहे.

आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या पडद्यावर गुंतलेल्या तरुणाईला पुन्हा एकदा पुस्तकांच्या पानांकडे वळविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होणार आहे. “वाचनातून विचार आणि विचारातून परिवर्तन” हा संदेश देत हा उत्सव सामाजिक जागृतीचे प्रतीक ठरणार आहे.

(Chhagan Bhujbal birthday)मंत्री भुजबळ यांचे संपूर्ण सार्वजनिक जीवन हे समाजासाठी कार्य करण्याच्या वृत्तीने प्रेरित राहिले आहे. त्यांच्या वाढदिवसाचा हा “ज्ञानदिनीचा सोहळा” म्हणजे समाजाला दिलेली प्रेरणादायी देणगी ठरणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना आणि वाचनालयांना उपलब्ध होणाऱ्या या पुस्तक संग्रहामुळे वाचन संस्कृतीचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

ज्ञानदान आणि संस्कार यांचा संगम साधणारा हा उपक्रम राजकीय व्यक्तिमत्त्वांनी वाढदिवस साजरे करण्याच्या परंपरेला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!