युवक राष्ट्रवादीकडून मंत्री छगनराव भुजबळांचा वाढदिवस ज्ञानोत्सवात साजरा
पुस्तक भेटीने उत्सवाला सामाजिक रूप
नाशिक, दि. १५ ऑक्टोबर २०२५ – Chhagan Bhujbal Birthday राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. छगनरावजी भुजबळ यांचा वाढदिवस यंदा युवक राष्ट्रवादीकडून सामाजिक आणि ज्ञानदायी पद्धतीने साजरा करण्यात आला.
मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ, पंकज भुजबळ, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या पुढाकाराने ६५ फूट उंच पुष्पहार, शाल, फेटा आणि ढोल-ताशांच्या गजरात भुजबळ यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, या उत्सवात युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुस्तक भेटीचा उपक्रम राबवला.कार्यकर्त्यांनी विविध विषयांवरील पुस्तके संकलित करून ती मंत्री भुजबळ यांना भेट दिली. या ‘ज्ञानोत्सव भेट’ उपक्रमामुळे वाढदिवस साजरा करण्याला एक वेगळे आणि समाजाभिमुख स्वरूप प्राप्त झाले.
भुजबळ फार्म येथे झालेल्या या सोहळ्यात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भुजबळ यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिकच्या विकासदृष्टीचा पाया रचणारे आणि शहरात ‘विकासपुरुष’ म्हणून ओळखले जाणारे भुजबळ यांच्या कार्याचा गौरव करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि उत्साहाच्या लाटेत सहभागी झाले.
राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, जे भुजबळ कुटुंबीयांचे निकटवर्तीय आहेत, यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. ढोल-ताशांच्या गजरात, आकर्षक सजावटीत आणि उत्साहात हा वाढदिवस साजरा झाला.
या प्रसंगी अमोल नाईक, मुकेश शेवाळे, दिपक पाटील, डॉ. संदिप चव्हाण, व्यंकटेश जाधव, हर्षल चव्हाण, बादल कर्डक, संतोष भुजबळ, रियान शेख, कुलदीप जेजुरकर, निलेश जाधव, महेश बाळसराफ, भूषण गायकवाड, संदिप खैरे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
🎓 राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून राहुल कदम यांची नियुक्ती (Chhagan Bhujbal Birthday)

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी राहुल कदम यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी ही घोषणा केली असून, मंत्री छगनराव भुजबळ यांच्या शुभहस्ते राहुल कदम यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.या प्रसंगी माजी खासदार समीरभाऊ भुजबळ, जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रनाना पगार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रसाद सोनवणे, सुशांत काकड, राजेंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
राहुल कदम यांच्या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री माणिकराव कोकाटे, आ. नितीन पवार, आ. दिलीप बनकर, आ. हिरामण खोसकर, आ. सरोज आहिरे, आ. पंकज भुजबळ यांनी अभिनंदन केले आहे.