छगन भुजबळ उद्या घेणार मंत्रिपदाची शपथ!

📍 सकाळी १० वाजता राजभवनात होणार शपथविधी सोहळा

2

राजकारणातले डावपेच,नाराजीचं राजकारण आणि अखेर मंत्रिपदाचा मुकुट -छगन भुजबळ पुन्हा एकदा सरकारचा भाग होणार!

मुंबई, दि. २० मे २०२५ – Chhagan Bhujbal Minister Oath  राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अखेर पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मंगळवारी सकाळी १० वाजता मुंबईतील राजभवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. फक्त ५० मान्यवरांच्या उपस्थितीत हा संक्षिप्त पण महत्त्वाचा सोहळा होणार आहे.

🕴️ नाराजीपासून मंत्रिपदापर्यंत…(Chhagan Bhujbal Minister Oath )
महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज होते. अनेकदा त्यांनी आपल्या नाराजीचा सूर उघडपणे मांडला होता. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका करून त्यांनी पक्षात असलेली अंतर्गत खदखदही अधोरेखित केली होती.

मागील काही दिवसांपासूनच त्यांच्या पुनरागमनाची चर्चा होती आणि अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भुजबळ यांच्या अनुभवाचा विचार करता, त्यांना पुन्हा मंत्रिपद देणे ही राजकीय गरज होती.

🍚 दोन दिवसात कोणते खाते मिळणार हे समजणार
विशेष म्हणजे, छगन भुजबळ यांच्याकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा खाते सोपवले जाण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी दोन दिवसात भुजबळांना नेमकं कोणते खाते मिळणार हे कळणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचं नाव आल्यानंतर, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या खात्यासाठी योग्य पर्याय म्हणून भुजबळ यांचं नाव पुढे आलं.

🗣️ पक्षातही मागणी होती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून रिक्त झालेल्या मंत्रिपदावर भुजबळ यांना संधी मिळावी, अशी मागणी पक्षांतर्गत पातळीवरूनही होत होती. पण अजित पवार यांचा निर्णय काही काळ प्रलंबित राहिला. अखेरीस आता त्यांच्या नावावर संमतीची मोहोर उमटली आहे.

🧠 अनुभवाला मान्यता
राजकारणात तब्बल चार दशकांचा अनुभव असलेल्या छगन भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला मंत्रिमंडळाबाहेर ठेवणे महायुतीसाठी अडचणीचं ठरत होतं. भुजबळांच्या नाराजीमुळे जनतेत चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून अखेर सरकारने त्यांची नाराजी दूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. […] भोवऱ्यात अडकलेल्या मुंडे यांनी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात ९ दिवसांची मौन […]

Don`t copy text!