मंत्री छगन भुजबळ यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिष्टचिंतन
मंत्री छगन भुजबळ यांनी वाढदिवसानिमित्त बुके, शाल ऐवजी स्विकारल्या वह्या : गोर गरीब, गरजू मुलांना होणार वह्यांचे वाटप
नाशिक,दि.१५ ऑक्टोबर २०२३ –राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा ७६ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवीत साजरा करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मंत्री मंडळातील सदस्य,देशभरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नेते, पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फोन, सोशल मीडिया तसेच नाशिक येथील कार्यालयात प्रत्येक्ष भेट घेऊन अभिष्टचिंतन केले.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त आज नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. या सोहळ्यास राज्यासह देशभरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आलेल्या मान्यवरांनी मंत्री छगन भुजबळ यांना वह्यांची भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
मंत्री छगन भुजबळ यांनी शुभेच्छा म्हणून स्विकारल्या वह्या
मंत्री छगन भुजबळ यांनी ७६ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा म्हणून शाल, बुके न आणता वह्या आणण्याचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले होते. या आवाहनाला प्रचंड असा प्रतिसाद लाभला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी शुभेच्छा म्हणून वह्या स्विकारल्या. या वह्या एकत्र करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांची वह्यानी तुला करण्यात आली. या वह्यांचे गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, मीनाताई भुजबळ, हिराबाई भुजबळ, डॉ.शेफाली भुजबळ, विशाखा भुजबळ, दुर्गाताई वाघ, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, जयवंतराव जाधव, बाळासाहेब कर्डक, नानासाहेब महाले, आनंद सोनवणे, शहराध्यक्ष योगिता आहेर, कविता कर्डक, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, संजय खैरनार, महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, मोहन शेलार, महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर, महिला शहराध्यक्ष आशा भंदुरे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, चेतन कासव, उत्तर महाराष्ट्र विद्यार्थी अध्यक्ष प्रसाद सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने अभिष्टचिंतन
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने क्रेनच्या सहायाने भव्य पुष्पहार घालण्यात आला. तसेच शाल, पुष्पगुच्छ व वह्या देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी ढोल ताशांच्या गजरात मंत्री छगन भुजबळ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. राज्यभरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी तर देशभरतील विविध राज्यांतील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
युवक राष्ट्रवादी कडून गरजू शालेय विद्यार्थ्यांना १००० वह्यांचे वाटप
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते छगनरावजी भुजबळ यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्या निमित्त मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ, पंकज भुजबळ व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी क्रेनच्या सहाय्याने २५ फूट पुष्पहार व शाल,फेटा घालत ढोल ताशांच्या गजराने जंगी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जमा केलेल्या १००० वह्यांचे वाटप मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते गरजू शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले.
मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी आवाहन केल्याप्रमाणे युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी १००० वह्यां घेऊन भुजबळांच्या हस्ते गरजू शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. भुजबळ यांचा वाढदिवस भुजबळ फार्म येथे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.नाशिकच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवणारे मंत्री छगन भुजबळांची नाशिकच्या जनतेत विकासपुरुष अशी छबी असून नाशिक शहरासोबत जिल्ह्यातील इतरही विविध विकासाच्या प्रकल्पांना त्यांनी चालना दिली आहे. नाशिक फेस्टिव्हलच्या नियोजनात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे हे भुजबळ कुटुंबियांचे निकटवर्तीय असून मंत्री छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जंगी तयारी करून ढोल ताशांच्या गजरात त्यांचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी आमदार दिलीप बनकर, अॅड.रविंद्र पगार, योगेश निसाळ, चेतन कासव, मुकेश शेवाळे, अमोल नाईक, संदिप गांगुर्डे, विशाल डोके, राहुल कमानकर, डॉ. संदिप चव्हाण, संतोष भुजबळ, कुलदीप जेजुरकर, अक्षय पाटील, रविंद्र शिंदे, संदिप खैरे, अक्षय परदेशी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.