मुंबई – रणरणत्या उन्हात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचाविरोधात मातोश्री बाहेर पहारा देणाऱ्या चंद्रभागा आजींची मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ८० वर्षीय चंद्रभागा शिंदे यांच्या शिवडी येथील घरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना आंब्याची पेटी भेट म्हणून दिली. तर रश्मी ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली.
चंद्रभागा आजी ८० वर्षाच्या आहेत. पण आमच्या युवा सैनिक आहेत. त्यांच्यासारखे शिवसैनिक आहेत म्हणून आम्ही आहोत. शिवसेनाप्रमुखांनी हे शिवसैनिक मला आशीर्वाद म्हणून दिले आहेत,असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तर हारेंगा नही, झुकेंगा नही साला असं म्हणत मुंबईत पुन्हा शिवसेनेचा येणार असं चंद्रभागा आजी म्हणाल्या. तर, तुम्ही आहात म्हणूनच आम्ही आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्येष्ठ शिवसैनिक आजींनी पुष्पा स्टाईलमध्ये राणा दांपत्यांना इशारा दिला होता. या आंदोलनादरम्यान त्या सक्रीय सहभागी झाल्या होत्या. या आधीही शिवसेनेच्या अनेक आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता. मातोश्रीसमोरील आंदोलनात ८० वर्षाच्या या आजींनी सगळ्यांचे लक्ष वेधले होते. साहेब, तुम्ही मागे हटू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आजींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजींची भेट घेतल्यानंतर आपण त्यांना लहानपणापासून पाहत असून त्या आता आजी झाल्या आहेत, मात्र त्या अजूनही युवासेनेच्या असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तर यावेळी चंद्रभागा शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या नातूसाठी नोकरी आणि घराची मागणी केली आहे. येत्या रविवारी आजींच्या नातूच लग्न आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लग्नाची पत्रिकाही दिली आहे.
बाळासाहेबांचे शिवसैनिक झुकनेवाले नही
सर्वांच्या लक्षात असेल. शिवसेनाप्रमुख म्हणायचे, व्यक्ती वयाने मोठी होत असते पण मनाने तरुण असली पाहिजे. ही आमची आजी असली तरी त्या युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. शब्दात बोलू शकत नाही. हे शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांनी दिलेला मोठा आशीर्वाद आहे. त्यामुळे त्यांच्या समोर नतमस्तक व्हायला आलो. काल त्या कडाक्याच्या उन्हात बसल्या होत्या. झुकेगा नही म्हणाल्या. बाळासाहेबांनी जे शिवसैनिक तयार केलेत ते झुकनेवाले नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.