मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार आहेत.आज रात्री ८ वाजता ते जनतेशी समाज माध्यमाद्वारे संवाद साधणार आहेत.
महाराष्ट्रात काही दिवसांपासून २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल केले आहे. परंतु मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा अद्याप बंद आहे. त्याच प्रमाणे हॉटेल व्यावसायिकांची ही सरकारवर नाराजी असून हॉटेल व्यवसायाला रात्री ११ वाजे पर्यंत परवानगी द्यावी अशी त्यांची मागणी आहे.
त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतील
CM Uddhav Balasaheb Thackeray will address the state tonight at 8 pm
Stay tuned on our Facebook/Twitter/YouTube Channel for the LIVE streamhttps://t.co/2xokOekMo2https://t.co/MmWFoeK2bU pic.twitter.com/KfqpJGHr2g
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 8, 2021