मुंबई,दि.२० जून २०२५:Chinmay Star Pravah स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘शुभविवाह’ आता एका मोठ्या वळणावर आली असून मालिकेत एक नव्याने रंगतदार पात्र दाखल होत आहे. सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मय उद्गिरकर तब्बल ११ वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या मालिकेत पुनरागमन करत आहे आणि तो साकारणार आहे अत्यंत गूढ आणि प्रभावशाली डॉक्टरची भूमिका.
नवीन पात्राचे नाव आहे डॉ. संकर्षण अधिकारी — भारतातील अग्रगण्य न्यूरोसर्जन. संकर्षण अत्यंत शिस्तप्रिय, गंभीर स्वभावाचा आणि रुग्णसेवेला प्राधान्य देणारा डॉक्टर आहे. मात्र, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठा आघात झाला आहे — त्याच्या पत्नीचा अपघाती मृत्यू, ज्यामुळे तो आतून कोसळून गेला आहे. आयुष्य जगण्याचं कारणच हरवलेला हा डॉक्टर आता केवळ आपलं कर्तव्य निभावत “दिवस ढकलतो” आहे.
आता संकर्षण डॉक्टर आकाशच्या जीव वाचवण्यासाठी भूमीच्या विनंतीला उत्तर देतो, मात्र एका अटीवर. ही अट नेमकी काय आहे? भूमी ती स्वीकारणार का? हे सर्व घडणार आहे पुढच्या भागांत, जे प्रेक्षकांना उत्कंठावर्धक वाटणार आहे.
चिन्मयने स्वतः या भूमिकेबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले:(Chinmay Star Pravah)
“स्टार प्रवाह माझ्यासाठी कायमच खास राहिलं आहे. ही भूमिका ऐकताक्षणीच मला आवडली. संकर्षणसारखा भावनिक आणि शिस्तबद्ध डॉक्टर मी प्रथमच साकारतोय. ही भूमिका माझ्यासाठी एक नवीन अनुभव ठरणार आहे.”
म्हणून विसरू नका पाहायला ‘शुभविवाह’, दररोज दुपारी २ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
चिन्मय उद्गिरकरच्या पुनरागमनामुळे मालिकेचं नवं पर्व सुरू होत असून, मालिकेच्या कथानकात एक भावनिक वळण आणि नवी रहस्ये उलगडली जाणार आहेत!