‘दिल मलंगी’ चित्रपटात चिन्मय उद्गीरकर, नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी यांच्या प्रमुख भूमिका!

0

मुंबई,दि. ६ जुलै २०२३ –अत्यंत मनमोहक कथा कल्पनेवरील ‘दिल मलंगी’ या अक्शन फँटसी चित्रपटाचे मुंबईतील एका आलिशान लोकेशनवर मुहूर्तासोबत चित्रीकरणाचा शुभारंभ झाला आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी हे आघाडीचे कलावंत पाहिल्याचं एकत्र स्क्रिन शेअर करीत आहेत. या चित्रपटात चौघांच्याही भूमिका एकदम हटके असून अधिक माहिती आता देऊ शकत नसलो तरी हे एक सरप्राईज पॅकेज आहे असे दिग्दर्शक सुनिल परब यांचे म्हणणे आहे.

Chinmoy Udgirkar, Nakshatra Medhekar, Meera Joshi in 'Dil Malangi' movie!

‘दिल मलंगी’ या महत्वाकांक्षी चित्रपटाच्या निर्मितीसाठी रमाकांत गोविंद भोसले, सौ. दीपा रमाकांत भोसले, प्रमोद मुरकुटे हे निर्माते एकत्र आले असून विविध क्षेत्रातील त्यांच्या अनुभवातून ‘दिल मलंगी’ ची अक्शन फँटसी रसिकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. सून माझी भाग्याची’, ‘छावणी’,’चंद्री’, ‘पहिली भेट’ या चित्रपटांसह अनेक दर्जेदार नाटकांचे दिग्दर्शन करणाऱ्या सुनिल परब यांच्या कल्पक दिग्दर्शनातून ही फँटसी प्रत्यक्षात पडद्यावर आकार घेत असून येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने वेगवान चित्रीकरणासाठी हालचाली सुरु करण्यात येत आहेत.

चित्रपटाची कथा सतेज ढाणे पाटील या तरुणाभोवती गुंफण्यात आली आहे. महाविद्यालयीन जीवनातच त्याचं खुल्लम खुल्ला प्रेम होतं…पण ज्या मुलीवर मनापासून प्रेम केलं ती निव्वळ आपला टाईमपास करतेय हे लक्षात आल्यावर ‘प्रेम’ ह्या संकल्पनेवरचा त्याचा विश्वास उडतो… साहजिकच करिअरवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने तो मुंबई गाठतो. बुद्धिबळावर तो ‘ग्लोबल ट्रान्स मिडिया’ या जाहिरात एजन्सीचे सर्वेसर्वा हर्षवर्धन मराठे यांचे मन जिंकण्यात यशस्वी होतो. मात्र ‘मुंबई नगरी’तल्या दैंनदिन प्रवासाला कंटाळून या शहराचा निरोप घेण्याचे ठरवितो. ही गोष्ट हर्षवर्धन यांना खटकते, ते सतेजला आणखी एक संधी देतात. ऑफिसच्या आलिशान रेस्ट हाऊसमध्ये सतेजचा मुक्काम सुरु होतो आणि त्याच्या आयुष्याचे चक्र फिरू लागते…

‘सद्गुरू एंटरटेनमेंट, दीपलक्ष्मी निर्मित’ मनमोहक ‘दिल मलंगी’च्या कथेला खुसखुशीत विनोदाची झालर असून या चित्रपटातून अलगद सामाजिक संदेश तरुणाईच्या मनात रुजविण्यासाठी दिग्दर्शक सुनिल परब यांनी रॉम कॉम ऍक्शन फँटसीचा आधार घेतला आहे. कथाकार स्वप्निल गांगूर्डे यांनी ‘हास्यजत्रा फेम’ अभिनेता प्रथमेश शिवलकर याच्यासोबत पटकथा लेखन केले असून संवाद प्रथमेश यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत चिन्मय उद्गीरकर, आस्ताद काळे, नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी, संजीव सत्यविजय धुरी यांसह प्रमुख सहाय्यक भूमिकेत नारायण जाधव, विनम्र भाबल, प्रभाकर मोरे, श्रीरंग देशमुख, आमिर तडवळकर, लीना पंडित, चित्रलेखा उपासनी, रुक्मिणी सुतार, मयूर धुरी, श्रुती हळदणकर, स्वाती कर्णेकर, प्रशांत देशमुख, मानसी बापट इत्यादी कलावंत आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.