नाशिकमध्ये सिटीलिंक बससेवा ठप्प :कर्मचारी संपावर; प्रवाशांचे प्रचंड हाल

0

नाशिक,दि.१३ एप्रिल २०२३ – नाशिक महानगर पालिकेच्या सिटीलिंक कंपनीच्या वतीने शहरात सुरू असलेली बससेवा सकाळपासून ठप्प असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.गेल्या तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार थकवल्याने कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले आहेत.

नाशिक शहरात मोठा गाजावाजा करून नाशिक महानगर पालिकेने बस सेवा सुरू केली होती. त्यासाठी नव्याने बस खरेदी करत पालिकेने कंपनी स्थापन केली होती. त्याच्या माध्यमातून शहरात सिटीलिंक बससेवा सुरू.काहीकाळातच सिटीलिंक बससेवा नाशिक करांची लाइफलाईन बनली असतानाच तिला वारंवार मात्र आता ब्रेक लागत आहे. सिटीलिंक बससेवा कर्मचाऱ्यांकडून वारंवार आंदोलने केली जात आहे. त्यामुळे नाशिककर हैराण झाले आहेत.

सिटीलिंक कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. पगार थकवल्याने याआधीही सिटीलिंक कर्मचारी संपावर गेले होते. गेल्या तीन महिन्यांपासून पगार नाही, दिवाळीचा बोनसही मिळालेला नसल्याने कर्मचारी पुन्हा एकदा संपावर गेले आहेत. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेची सिटीलिंक बससेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे.

नियमित पगार नसल्याने बससेवेचे सर्व कंत्राटी कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळेच त्यांनी थेट संप पुकारला आहे. या सर्व प्रकारात मात्र, प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. दररोज सिटी बससेवेचा हजारो प्रवासी लाभ घेतात. खासकरुन सकाळच्यावेळी प्रवाशांची संख्या मोठी असते. आणि आज सकाळपासून रस्त्यावर एकही बस धावलेली नाही.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.