जम्मू काश्मीर मध्ये ढगफुटी : ४ जणांचा मृत्यू तर ४० जण बेपत्ता

0

श्रीनगर – जम्मू काश्मीर मधील किश्तवाडमध्ये ढगफुटी होऊन ४ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ४० जण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.जोरदार पावसामुळे मदत कार्यात अडचणी निर्माण होत असून एसडीआरएफची टीम आणि जम्मू-काश्मीर पोलीस घटनास्थळी पोहचले असून मदतकार्यास सुरुवात केली आहे.हवाई दलाची हि मदत घेतली जात असून हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.जबरदस्त पावसामुळे नेटवर्क मिळण्यातही अडचणी येत आहेत. जोरदार पाऊस सुरु असून या ठिकाणी हाय अलर्ट जाहीर केला आहे.

उत्तरेकडे मोठ्याप्रमाणात मान्सूनचे ढग जमा झाले असून हवामान विभागाने दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या जम्मू-काश्मीरपासून २००किलोमीटर दूर असलेल्या किश्तवाडमध्ये जोरदार पाऊस सुरू असून या ठिकाणी मदतीसाठी लष्कर आणि पोलिसांची एक टीम पाठवण्यात आल्याचं किश्तवाडचे जिल्हाधिकारी अशोक कुमार शर्मा यांनी सांगितलं.

जोरदार पावसामुळे अनेक भागात दरड कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात आले आहे येत्या काही दिवसात जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नदीनाल्यांच्या पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे नदी, नाले, दरड प्रवण क्षेत्राच्या परिसरात जे लोक राहत आहेत, त्यांना धोका निर्माण होऊ शकतो, असं जिल्हा प्रशासनाने म्हटलं आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.