अमरनाथ  गुहेजवळ ढगफुटी : २५ टेंट आणि २ लंगर पाण्यात वाहून गेल्याची भीती !

0

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरच्या अमरनाथ यात्रेत ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरनाथमध्ये पवित्र गुहेजवळ संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ढगफुटी झाल्याची माहिती समजली आहे.या घटने मुळे यात्रा काही काळ साठी स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

प्राथमिक माहिती नुसार ढगफुटीनंतर पाणी वाढल्यामुळे अनेक भाविक या पाण्यात अडकले आहेत. भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचाव दल पोहोचले आहेत. या घटनेचे थरकाप उडवणारे व्हिडीओदेखील समोर आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या ढगफुटीत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा सतत वाढत आहे. अमरनाथ गुहेजवळ मोठ्या संख्येने भाविक जमा झाले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आज शुक्रवारी (दि. ८ जुलै )सायंकाळी साडे पाच वाजता ढगफुटी झाल्याची बातमी आहे. ज्यावेळी ढगफुटीचं वृत्त समोर आलं, त्यावेळी गुहेजवळ १० ते १५ हजार भाविक उपस्थित होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र जम्मू-काश्मीर पोलिसांनी दोन लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.

ढगफुटीची घटना पवित्र गुहेजवळील एक ते दोन किमीच्या अंतरावर घडली. हिमालय रांगातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भाविकांसाठी लावलेले २५  टेंट आणि दोन लंगर पाण्यात वाहून गेले. पावसामुळे या संपूर्ण भागात पाणी जमा झालं आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!