राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; १ एप्रिलपासून नवे दर

‘सीएनजी’वरील व्हॅट १३.५ ऐवजी आता ३ टक्के

0

मुंबई –उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने शुक्रवार दि.२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे दि. १ एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार असून याचा फायदा ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदूषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्त्वाचा आहे. सीएनजीचे कमी झालेले नवे दर दि. १ एप्रिल २०२२ पासून लागू होतील.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!