नाशिक,२० नोव्हेंबर २०२२ – राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणावर जाणू लागला असून अनेक शहरात पारा १० अंशाच्या खाली उतरला आहे. नाशिकमध्ये किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत असल्याचं बघायला मिळत असून निफाडमध्ये ७.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची आज नोंद झाली आहे.तर नाशिक शहरात देखील पारा ९.८ अशांवर येऊन पोहोचल्याने नाशिककर सध्या चांगलेच गारठले आहेत.आठवडाभरातच हा पारा तब्बल ६ अंशांनी घसरला आहे.
सातारा – महाबळेश्वरमधील पारा आणखी घटला महाबळेश्वर किमान तापमाना ७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून ,वेण्णालेक ६ अंशावर खाली आल्यामुळे महाबळेश्वरवासीय आणि पर्यटक चांगलेच गारठले .
ग्रामीण भागात सकाळी सकाळी धुकं पडलेलं बघायला मिळतं आहे. ठिकठिकाणी पहाटे आणि भल्या सकाळी लोक शेकटोची ऊब घेताना दिसत आहेत.राज्याच्य बहुतांश भागाला थंडीनं हुडहुडी भरली असून, ग्रामीण भागात सकाळी सकाळी धुकं पडलेलं बघायला मिळतं आहे.
पुण्यातही थंडीचा जोर चांगलाच वाढला असून, थंडीपासून बचावासाठी पुणेकर कानटोप्या, स्वेटर घालून चहाचा आस्वाद घेत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तर काहीजण व्यायाम करताना दिसत आहेत.रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्यानं शेतकरी आनंदीत झाला आहे.