महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार : निफाड मध्ये ५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद

पुणे ,औरंगाबाद शहराच्या किमान तापमानात घट

0

नाशिक,दि.९ जानेवारी २०२३ – उत्तरेकडून येणाऱ्या शितलहरीमुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे.त्यामुळे महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. या मोसमातील सर्वात नीचांकी तपमान आज निफाडमध्ये नोंदवले गेले आहे. कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात झालेल्या नोंदीनुसार, निफाड तालुक्यातील थंडीचा सरासरी पारा ५ अंशांवर पोहचला आहे.तर नाशिकचे किमान तापमान ८.७ एवढे नोंदवले गेले आहे.पुढील ४८ तासात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

नवीन वर्षात किमान तापमानाचा पारा घसरल्याने निफाडकरांना हुडहुडी भरली आहे.काल निफाडमध्ये १० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आज निफाडमध्ये अचानक थंडीत वाढ झाल्याने ५ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली आहे. या थंडीपासून उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. पुणे वेधशाळेनेमहाराष्ट्रात शीतलहर येणार असल्याचा इशारा दिला आहे.

पुणे ,औरंगाबाद शहराच्या किमान तापमानात घट
पुणे शहराच्या किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झालीय..आज किमान तापमान ८.६ अंशांवर आले होते. तर औरंगाबाधे तापमान ५.७ नोंदविण्यात आले. येत्या तीन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

राज्यात किमान १० ते १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
राज्यभरातील बहुतांश ठिकाणी तापमान घट झाली आहे. पहाटे थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत. राज्यात १० ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आली असून राज्यातल्या थंडीत वाढ झाली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.