
मुंबई | १३ मार्च २०२६ :Colors Marathi new serial नाती ही फक्त रक्ताचीच असतात असं नाही; कधी कधी मनाने जुळलेली नाती अधिक मजबूत आणि जिव्हाळ्याची ठरतात. अशाच भावनिक आणि संघर्षमय नात्यांची कथा सांगणारी नवी मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका १६ मार्चपासून दररोज संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठी वर प्रसारित होणार आहे.
या मालिकेचा नुकताच प्रदर्शित झालेला प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून कथानकाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर(Bharti Achrekar )यांची दमदार भूमिका. त्या ‘बाई-आजी’ या प्रभावी आणि ठाम व्यक्तिरेखेत प्रथमच मराठी मालिकेत दिसणार आहेत.
छवी आणि बाई-आजींचं अतूट नातं(Colors Marathi new serial)
मालिकेची कथा राजगुरू परिवाराभोवती फिरते. या कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणजे बाई-आजी. एका अपघातात मुलगा आणि सून गमावल्यानंतर त्यांनी आपल्या नातवंडांना आईची माया देत घर सांभाळलं आहे.याच घरात वाढलेली छवी ही मालिकेची नायिका आहे. ती पारंपरिक चौकटीत बसणारी ‘परफेक्ट’ मुलगी नाही; उलट थोडी बडबडी, उत्साही पण तितकीच बुद्धिमान आणि प्रामाणिक स्वभावाची आहे. बाई-आजींवर तिची अपार श्रद्धा असून त्या देखील प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी छवीवरच विश्वास ठेवतात.छवीची भूमिका अभिनेत्री जान्हवी तांबट साकारत असून तिच्या साधेपणातली ताकद ही या कथानकाची खरी ओळख ठरणार आहे.
सूडाची सावली – शांभवीचा धोकादायक डाव (Colors Marathi new serial)
राजगुरू कुटुंबाच्या सुखी आयुष्यावर वाकडी नजर आहे ती शांभवीची. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री अमृता फडके साकारत आहे. शांभवी अत्यंत चतुर, महत्त्वाकांक्षी आणि सूडाने पेटलेली आहे. तिच्या भूतकाळात दडलेलं रहस्य आणि बदला घेण्याची भावना राजगुरू कुटुंबावर मोठं संकट आणणार आहे.छवीला तिचा डाव समजेल का?राजगुरू कुटुंबाचं रक्षण करताना छवीला कोणत्या संघर्षांना सामोरं जावं लागेल?आणि शांभवीच्या सूडामागचं खरं कारण काय आहे?या प्रश्नांची उत्तरं मालिकेत उलगडत जाणार आहेत.
दमदार कलाकारांची फळी
या मालिकेत अनेक अनुभवी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
वत्सला- वंदना वाकनीस,
अनिकेत – संचीत चौधरी,
साकेत – अमित रेखी
बेबी आत्या – दिशा दानडे
हे सर्व कलाकार कथेला वेगवेगळ्या छटा देणार आहेत.
‘कूल’ पण कणखर बाई-आजी
मालिकेविषयी बोलताना अभिनेत्री भारती आचरेकर(Bharti Achrekar ) म्हणाल्या,“बाई-आजी ही फक्त पारंपरिक आजी नाही. ती आधुनिक विचारांची, काळानुसार बदल स्वीकारणारी आणि नातवंडांशी मैत्रीपूर्ण नातं ठेवणारी स्त्री आहे. स्निकर्स घालून आत्मविश्वासाने वावरणारी, पण घराचा कणा असलेली ही व्यक्तिरेखा मला साकारायला मिळणं माझ्यासाठी खूप खास आहे. इतक्या वर्षांच्या कारकिर्दीनंतर मराठी मालिकेत मध्यवर्ती भूमिका करण्याचा हा माझ्यासाठी नवीन टप्पा आहे.”
प्रेक्षकांसाठी भावनिक आणि संघर्षमय कथा
मालिकेविषयी बोलताना Executive Vice President – Marathi Cluster सतीश राजवाडे(satish Rajwade) यांनी सांगितले की,“‘मी जिंकून घेईन सारं’ ही जिद्द, नात्यांची गुंतागुंत आणि कुटुंबातील मूल्यांची कहाणी आहे. ही अशी मालिका आहे जी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावी अशी आहे. छवीच्या आयुष्यात बाई-आजी तिचं सर्वात मोठं आधारस्थान आहेत आणि त्यांच्या विश्वासामुळेच ती प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची ताकद मिळवते.”
संघर्ष, नाती आणि जिद्दीची कथा
मालिकेच्या टीझरमध्ये बबी आत्या या व्यक्तिरेखेचीही झलक पाहायला मिळते. तिची उपस्थिती कथेला नवं वळण देणार आहे. घरातील संघर्ष, नात्यांमधील ताणतणाव आणि एका ठाम स्त्रीची जिद्द यांची झलक या मालिकेत पाहायला मिळणार आहे.वादळं कितीही आली तरी छवीचा विश्वास एकच —“येऊदे कितीही अडचणीचं वारं… मी जिंकून घेईन सारं.” पहा ‘मी जिंकून घेईन सारं’ – १६ मार्चपासून दररोज संध्याकाळी ७ वाजता फक्त Colors Marathi वर.

