काव्यांजली मालिकेतून सानिका काशीकरची एक्झिट..

‘ही’अभिनेत्री साकारणार श्रेष्ठाची भूमिका

0

मुंबई,दि,१६ जानेवारी २०२४ –कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका काव्यांजली- सखी सावली या मालिकेत काव्या आणि अंजली या दोघी बहिणींच्या जोडीला तसेच प्रितम-अंजली या जोप्याला ही प्रेक्षकांची पसंती मिळतेय.

मालिकेतील श्रेष्ठा व निकिता यांची कायमच विश्वजीत आणि प्रितमला काव्या व अंजलीपासून दूर करण्याचे कारस्थान चालू असतं. या मालिकेत श्रेष्ठाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सानिका काशीकरने मालिकेतून एक्झिट घेतली आहे.

सानिका काशीकरने मालिका सोडली असून आता अभिनेत्री अपूर्वा परांजपे या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. श्रेष्ठाची नकारात्मक भूमिका असली तरी प्रेक्षकांना तितकीच पसंतीची आहे. काव्यांजलीमध्ये नवीन श्रेष्ठाची एंट्री पाहण्यासाठी नक्की बघा, काव्यांजली-सखी सावली,सोम-शनि, ८.३० वा. कलर्स मराठीवर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.