गणेशोत्सवापूर्वी सर्व कामे त्वरित पूर्ण करा अन्यथा खळ खट्याक आंदोलन  

नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळातर्फे मनपा आयुक्ताना व स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना  निवेदन

0

नाशिक ( प्रतिनिधी )   सालाबाद प्रमाणे येऊ घातलेल्या गणेशोत्सवासाठी नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळातर्फे  विविध मुद्यांबाबत नाशिक मनपा आयुक्त व स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन आज  नासिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आले .या प्रसंगी गजानन शेलार , रामसिंग बावरी , विनायक पांडे , सत्यम खंडाळे ,राजेंद्र बागुल ,गणेश बर्वे ,बबलू परदेशी ,प्रथमेश गीते ,महेश महंकाळे, पोपटराव नागपुरे यांच्यासह विविध गणपती मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते .

स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले निवेदन 

बी . डी. भालेकर हायस्कूल मैदानात मोठमोठ्या गणेशोत्सवाचे देखावे केले जातात . परंतु या वर्षी तेथे पाईप , मलबा , इलेक्ट्रिक वायर्स  याचा मोट्या प्रमाणात कचरा जमा झाला असून तो तातडीने दूर करण्यात यावा . स्मार्ट सिटीच्या कामामुळे महावितरणच्या लाईन्स काही ठिकाणी नादुरुस्त झालेल्या आहेत , तेथे त्वरित नवीन केबल टाकणे आवश्यक आहे अन्यथा त्या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता आहे . तरी स्मार्ट सिटी व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सदर तक्रारीची त्वरित दाखल घेऊन उचित कारवाई करणे आवश्यक आहे . स्मार्ट सिटी अंतर्गत मंजूर करण्यात आलेले सी.सी.टी.व्ही . कॅमेरे त्वरित बसविण्यात यावे त्यामुळे वाहतूक पोलीस व बंदोबस्तावरील पोलीस याना मदत होईल . स्मार्ट सिटी ने नियुक्त केलेल्या ठेकेदारांकडून प्रस्तावित केलेली कामे त्वरित पूर्ण करून घेण्यात यावेत .

Complete all work immediately before Ganeshotsav otherwise Khal Khattak agitation

जे ठेकेदार काम पूर्ण करण्यास टाळाटाळ करीत असतील त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांचे कामे काढून इतर नवीन ठेकेदारांना देण्यात यावीत स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेली कामे प्राथमिकरीत्या पूर्ण करण्यात यावीत त्या नंतरच दुसरी कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात यावे .गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग त्वरित पूर्ण करण्यात यावा .सदर मार्गावरील प्रलंबित असलेली डांबरीकरणाचे कामे ,काँक्रिटीकरणाची कामे  तसेच या मार्गावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत . महावितरणची केबल्स  भूमिगत करण्यात याव्यात . रस्त्याच्या साईड पट्ट्यांची कामे त्वरित करण्यात यावीत. नाशिक शहरातील व पंचवटी परिसरातील सर्व हि कामे गणेश उत्सव सुरु होणे अगोदर त्वरित पूर्ण करण्यात यावीत अन्यथा नाशिक शहरातील सर्व गणेश मंडळे गंभीर दाखल घेऊन खळ खट्याक आंदोलन करू असा गंभीर इशारा देण्यात आला .

मनपा आयुक्तांना देण्यात आलेले निवेदन

श्री गणेश मंडळाच्या उत्सव परवानगी अर्जास एक खिडकी योजने अंतर्गत परवानगी देण्यात यावी . नाशिक महानगर पालिका , नाशिक पोलीस आयुक्त व नाशिक वाहतूक पोलीस यांची एकत्रित परवानगी एक खिडकी योजनेतून देण्यात यावी . एक खिडकी योजनेसाठी स्वतंत्र कक्ष व अधिकारी नेमण्यात यावा . परवानगी अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने स्वीकारण्यात यावा तसेच अर्ज दिल्यानंतर चोवीस तासात परवानगी देण्यात यावी . मंडळांना मिळणाऱ्या जाहिरातीवर कोणताही कर आकारण्यात येऊ नये तसेच गणपती मंडळांची मंडळ फी हि कर मुक्त असावी .

शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत काम करण्यात येत असून जागोजागी खोदलेल्या रस्त्यांचे त्वरित डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्यात यावे . रस्त्यावरील गणेश मंडळाच्या जवळ जमा होणारा कचरा व मलबा याची विल्हेवाट लावण्यात यावी . गणेश मिरवणूक मार्गावरील असलेल्या आडव्या विदुत लाईनचे भूमिगत विदूतीकरण  करण्यात यावे . तसेच शहरातील बंद असलेले हायमास व विदुत दिवे यांची त्वरित दुरुस्थी करून ते कायम सुरु राहतील याची दक्षता घ्यावी . गणपती उत्सव काळात सायंकाळी ६ वाजेनंतर शहरात कार्यरत असलेल्या सिटीलिंक बसचे अशोक स्तंभ , रविवार कारंजा , शालिमार , पंचवटी या भागातील मार्ग बदलण्यात यावे अशी हि मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.