भारतीय जैन संघटनेच्या वतीने मिशन झिरो व मिशन लसीकरण मोहिमेची सांगता

0

नाशिक : कोरोना महामारीने सर्व विश्व व्यापले आहे. त्यावर मात करण्यासाठी अनेकांप्रमाणे भारतीय जैन संघटना या स्वयंसेवी संस्थेने सुरुवाती पासून म्हणजे मार्च २०२० पासून रचनात्मक व सर्वव्यापी कार्य सुरु ठेवले आहे.कोरोनाचे संकट आटोक्यात आले असले तरीही आव्हाने संपलेली नाहीत. ३५ वर्षांपासून भारतीय जैन संघटना विविध सामाजिक उपक्रम राबवत लोकसेवेचे वसा पुढे नेत आहे .भारतीय जैन संघटनेच्या वतीने मिशन झिरो व मिशन लसीकरण मोहिमेची सांगता जरी झाली असली तरी जोपर्यंत कोरोनावर संपूर्ण विजय मिळवून त्याला हद्दपार करीत नाही तो पर्यंत सेवाकार्य अखंडितपणे सुरु राहील असे बी जे एस चे राज्य प्रभारी व प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला यांनी सांगितले.

नागरिकांची लसीकरणापूर्वी अँटीजेन किंवा आर टी पी सी आर चाचणी होऊन त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना हुडकून त्यांना आवश्यक सल्ला व उपचार उपलब्ध करून देणे व निगेटिव्ह व्यक्तींचेच लसीकरण व्हावे या संकल्पने द्वारे एकत्रितपणे मिशन झिरो (टप्पा २) व मिशन लसीकरण हे अभियान नाशिक महानगर पालिका व भारतीय जैन संघटना यांच्या वतीने पंचवटी, नाशिक रोड, नाशिक पश्चिम विभागात दि १० मे २०२१ पासून सुरु करण्यात आले होते. गत ३ महिन्यांच्या अथक मेहनती नंतर सदरील अभियान बी जे एस च्या वतीने तूर्तास थांबविण्यात येत आहे.या कालावधीत १५ लसीकरण केंद्रांवर ५०११२ व्यक्तींच्या अँटीजेन चाचण्या होऊन त्यातून २२१ पॉझिटिव्ह रुग्णांना लवकर शोधण्यात यश येऊन त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आले. तसेच ६५२५६ व्यक्तींचे अत्यंत शिस्तीने व लसीकरणा करिता केंद्रावर आलेल्या वयस्कर व विशेष व्यक्तींना सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन लसीकरण पूर्ण करण्यात आले. ह्या अभियानास वॉटर ग्रेस कंपनी, नाशिक वॉरियर्स व शिवानंद इलेक्ट्रॉनिक्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

दिंडोरी रोड, पेठ रोड व लासलगाव येथील बाजार समितीच्या कांदा व भाजीपाला मार्केट यार्डात स्मार्ट हेल्मेट द्वारे मास स्क्रिनिंग या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्दीतील ८६६९० नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले त्यांच्या शारीरिक तापमानाची चाचणी करण्यात येऊन १०२७ संशयित रुग्णांच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे गर्दीत होणारे पुढील संक्रमण थांबवून मिशन झिरो मोहिमेला बळकटी मिळाली.

गेल्या १८ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात व महाराष्ट्रात विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस ) पुढाकाराने राज्यस्तरावर मोठया प्रमाणावरती सेवा कार्य सुरु आहे. नाशिक शहरात फूड पॅकेट्स, किराणा सामानाचे किट, मास्क व सॅनिटायझरचे गरजूंना वेळोवेळी वितरण करण्यात आले. एप्रिल ते मे २०२० या पहिल्या लॉकडाउन च्या काळात फिरत्या दवाखान्याद्वारे १२३४७ रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यांना गरजेनुसार वैद्यकीय सेवा व विनामूल्य औषधे पुरविण्यात आली. व त्यातून पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यात यश मिळाले. बी.जे.एस. मिशन : ब्लड कलेकशन अंतर्गत मार्च ते एप्रिल २०२० दरम्यान विविध रक्तदान शिबिरांतून ४७९ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. मे ते जुलै २०२० दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने ३८४०० + कुटुंबांना म्हणजेच १७५००० + व्यक्तींना होमिओपॅथिक औषधांचे वाटप करण्यात आले.

मिशन झिरो (टप्पा १) अंतर्गत जुलै ते सप्टेंबर २०२० या काळात सलग ६२ दिवसात ७५१६६ व्यक्तींच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात १२५९५ पॉझिटिव्ह रुग्णांचा लवकर शोध घेण्यात यश आले. जुलै ते सप्टेंबर २०२० दरम्यान स्मार्ट हेल्मेटद्वारे १०५१०५ व्यक्तींच्या थर्मल स्क्रीनिंगमुळे पुढील संक्रमण थांबण्यास व अधिक फ़ैलाव न होण्यास मदत झाली. संघटनेने या शिवाय जनजागृती अभियान, तापमान व प्राणवायू प्रमाण तपासणी, आरटीपीसीआर स्वॅप चाचण्या , प्लाझमादान, अल्प दरात एचआरसीटी- सिटी स्कॅन चाचणी, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ची उपलबध्दता, कोविड १९ मुळे आई वडील किंवा वडील किंवा आई गमावलेल्या इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुनर्वसना करिता बी जे एस वाघोली शैक्षणिक पुनर्वसन केंद्रात प्रवेश देणे असे कार्य अविरत सुरु ठेवले आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांना स्मार्ट हेल्मेट, थर्मल स्क्रिनिंग व अँटीजेन चाचण्या यांच्या माध्यमातून लवकर शोधून काढणे, लगेच औषधे व उपचार करणे, समुपदेशन करणे, रुग्णांचा पाठ पुरावा करणे व कुटुंबातील व संपर्कातील इतर सदस्यांचीही तपासणी करणे या मुळे सदरील रुग्ण बरे होऊन त्यांना शारीरिक व मानसिक बळ देण्यात, पुढील होणारे संक्रमण थांबविण्यात, तसेच रुग्ण गंभीर होण्याचे किंवा मृत्य होण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होण्यात मिशन झिरो नाशिक अभियानाला मोठ्या प्रमाणात यश आले आहे. नाशिक मधील समूह कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी मिशन झिरो ची मोलाची मदत झाली आहे.

या कार्यासाठी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा , नाशिकचे पालकमंत्री छगनराव भुजबळ , महापौर सतीशनाना कुलकर्णी , मनपा आयुक्त कैलास जाधव , विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी सूरज मांढरे, म न पा पदाधिकारी व सर्व लोकप्रतिनिधींचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले .

कोरोनाचे संकट आटोक्यात आले असले तरीही आव्हाने संपलेली नाहीत. ३५ वर्षांपासून भारतीय जैन संघटना विविध सामाजिक उपक्रम राबवत लोकसेवेचे वसा पुढे नेत आहे . जोपर्यंत कोरोनावर संपूर्ण विजय मिळवून त्याला हद्दपार करीत नाही तो पर्यंत सेवाकार्य अखंडितपणे सुरु राहील असे बी जे एस चे राज्य प्रभारी व प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला यांनी सांगितले.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी महापौर सतीश नाना कुलकर्णी, आयुक्त कैलास जाधव, उपमहापौर भिकुभाई बागुल, स्थायी समिती अध्यक्ष गणेश गीते यांचे सह म न पा चे पदाधिकारी, नगरसेवक, आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ राजेंद्र त्र्यंबके, डॉ आवेश पलोड, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंके, कोरोना नोडल अधिकारी डॉ विजय देवकर, डाॅ जितेंद्र धनेश्वर, डॉ चारुदत्त जगताप, डॉ. कल्याणी होळकर, आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या बरोबरीने मिशन झिरो व मिशन लसीकरण मोहिमेचे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला, दीपक चोपडा, ललित सुराणा, अभय ब्रम्हेचा, अमित बोरा, गोटू चोरडिया, गौतम हिरन, रवींद्र चोपडा, रोशन टाटीया, वॉटर ग्रेसचे चेतन बोरा, नाशिक वॉरियर्सचे नरेंद्र गोलिया, गोपाल अटल, रामेश्वर मालानी, राजा जॉली, विनोद गणेरीवाल, ओम रुंगठा, शिवानंद इलेक्ट्रॉनिक्सचे एम के बिरमानी, स्वामी समर्थ मंदिर रविवार पेठ चे अॅड राजेंद्र लोढा यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.