गृह प्रदर्शन शेल्टर ची सांगता : ६३७ कोटी हून अधिक उलाढाल
४५० फ्लॅट्स, १०० प्लॉट ची स्पॉट बुकिंग: जवळपास ५०००० जणांनी दिली भेट तसेच एक हजाराहून अधिक साईट विझीट
नाशिक – कोणत्याही शहराच्या विकासात बांधकाम व्यावसायिकांचे मोलाचे स्थान असून एकाच छताखाली विविध पर्याय देण्याचे काम क्रेडाई निरंतर करत आहे . नाशिकच्या ब्रँडिंग साठी देखील क्रेडाईने नेहमीच पुढाकार घेतला असून भविष्यात एज्युकेशन, मेडिको टुरिझम व अॅग्रो हब म्हणून शहराला पुढे नेण्यासाठी शहराची संस्कृती व पर्यावरण टिकविणे ही देखील आपणा सर्व नागरिकांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले. त्या क्रेडाई नाशिक मेट्रो द्वारे येथील डोंगरे वस्तीगृह मैदानावर आयोजित शेल्टर 2022 या गृहप्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
या ५ दिवसीय प्रदर्शन कालावधी मध्ये जवळपासपन्नास हजार नागरिकांनी प्रदर्शनास भेट दिली. तसेच ४५० फ्लॅट्स आणि १०० प्लॉट ची नोंदणी केली. या प्रतिसादामुळे सुमारे नाशिक च्या बाजारात जवळपास ६३७ कोटीची उलाढाल झाली आहे. या प्रतिसादामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार आणि व्यवसाय निर्मिती होणार असून येत्या काळात अनेकांना नाशिक मध्ये अनेक नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या समारोप प्रसंगी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आ. देवयानी फरांदे, आयजी (पोलीस) बी जी शेखर, राष्ट्रीय क्रेडाई चे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, राष्ट्रीय क्रेडाई च्या घटना समितीचे प्रमुख जितुभाई ठक्कर, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन, शेल्टर चे समन्वयक कृणाल पाटील, क्रेडाई महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद खैरनार, शेल्टरचे प्रायोजक ललित रुंग्टा व दिपक चंदे हे मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात डॉ पवार पुढे म्हणाल्या की, भविष्यात उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांना तोंड देण्यासाठी सर्वांनी निरोगी राहणे आवश्यक आहे त्यासाठी बांधाकाम व्यावसायिकांनी आपल्या इमारतींमध्ये जिम, जॉगिंग ट्रक सारख्या सोयी पण द्याव्यात अशी अपेक्षा हि त्यांनी व्यक्त केली. निर्माणाधीन चेन्नई – सुरत महामार्ग तसेच निफाड मधील प्रस्तावित मल्टी लॉजीस्टिक पार्क यामुळे देखील नाशिक मध्ये अनेक नव्या संधी येतील असेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले की, नाशिक हि पवित्र भूमी असून हवामान, आरोग्य, चांगले अन्न, मुबलक पाणी हि आपल्याला मिळालेली दैवी देणगी आहे. यामुळेच नाशिकमध्ये आपले घर असावे हे अनेकांचे स्वप्न असते. नाशिक मध्ये तुलनात्मक दृष्ट्या दर कमी असून मनुष्यबळ प्रशिक्षणामध्येहि क्रेडाई ने महत्वाची भूमिका बजावली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आपल्या मनोगतात आ. देवयानी फरांदे म्हणाल्या की, नाशिकची स्कायलाईन बदलत असून बहुमजली इमारतींमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. समृद्धी महामार्गामुळे विदर्भ – मराठवाडा पण जवळ येणार असून तेथील ग्राहक पण नाशिकला निश्चित येणार आहे. नाशिक – मुंबई महामार्गाचे काँक्रीटीकरण करून हा रस्ता देखील मोठा होणार असून त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. हाच मार्ग समृद्धी महामार्गाला जोडल्यानंतर नाशिकहून मुंबई व नागपूर येथे त्वरीत पोहचता येईल. रेरा कायदा आणि युनिफाईड डिसीपीआर मुळे बांधकाम बांधकाम क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकात बोलतांना क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले की, यावेळेस शेल्टर मध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सर्व स्टॉल चे बुकिंग देखील सप्टेंबर महिन्यातच पूर्ण झाले होते. प्रदर्शनामध्ये सहभागी विकसकांनी भविष्यातील नाशिक कसे असेल याची झलकच दाखविली. उंच इमारती, .मोठ्या शहरांसारख्या टाऊनशिप तसेच अल्ट्रा लक्झरीअस अपार्टमेंटला पसंत केले गेले. मुंबई आणि पुणे यांच्या तुलनेत नाशिक येथील रियल इस्टेट चे दर तुलनात्मक दृष्ट्या खूपच कमी व सामान्यांच्या आवाक्यात असल्याने आज नाशिक मध्ये रियल इस्टेट मध्ये केलेली गुंतवणूक भविष्यामध्ये निश्चितच फायदेशीर ठरेल असेही ते म्हणाले. शेल्टर चे यश हे टीम वर्क असून यावेळेस बुकींगचे प्रमाण पण चांगले आहे. भविष्यात यापेक्षा पण मोठे प्रदर्शन क्रेडाई तर्फे आयोजित करण्यात येईल.
शेल्टर चे समन्वयक कृणाल पाटील यांनी सांगितले की, क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित शेल्टर प्रदर्शननाने अनेक नवे उच्चांक प्रस्थापित केले असून नाशिक ब्रॅण्डिंग करिता क्रेडाई ने केलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे असे यामुळे म्हणता येईल . अतिभव्य आंतर राष्ट्रीय स्तरास साजेसे असे नीटनेटके आयोजन , आकर्षक आणि नावीन्यपूर्ण स्टॉल , पार्किंग ची प्रशस्त सोय, विविध आकर्षक ऑफर्स ची रेलचेल या मुळे राज्यातील हे गृह प्रदर्शन विशेष आकर्षण ठरले.
आ. रोहित पवार यांची प्रदर्शनास भेट
आपल्या पूर्व नियोजित कार्यक्रमातून वेळात वेळ काढून कर्जत जामखेड चे आ. रोहितदादा पवार यांनी प्रदर्शनास भेट दिली. अनेक स्टोल मध्ये जाऊन त्यांनी बदलते नाशिक चे चित्र प्रत्यक्षात बघितले.
लकी ड्रॉ द्वारे निवडलेले चौथ्या दिवसातील भाग्यवंत असे
1) केतन त्रिवेदी
2) संदीप येवला
3) शरद
4) महेश सोनवणे
5) असिफ शेख
याप्रसंगी डॉ उमेश काळे, डॉ प्रशांत खैरे तसेच शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. शेल्टर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर , राष्ट्रीय क्रेडाईचे समिती प्रमुख [ घटना ] जितुभाई ठक्कर , महाराष्ट्र क्रेडाई चे सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन, शेल्टर चे समन्वयक कृणाल पाटील तसेच माजी अध्यक्ष किरण चव्हाण , सुरेश पाटील , नेमीचंद पोतदार , उमेश वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभत असून क्रेडाई नाशिक मेट्रो चे मानद सचिव गौरव ठक्कर , कोषाध्यक्ष हितेश पोतदार , सहसचिव अनिल आहेर, सहसचिव सचिन बागड तसेच कमिटी सदस्य नरेंद्र कुलकर्णी , नितीन पाटील, मनोज खिवंसरा , अंजन भालोदिया, अतुल शिंदे, सुशील बागड, राजेश आहेर, हर्षल देशमुख, श्रेणिक सुराणा, नरेंद्र कुलकणी, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके हे कार्यरत आहेत