“माझी माय गोदा माय” छायाचित्र व चित्र प्रदर्शची सांगता 

0

नाशिक,१६ नोव्हेंबर २०२२ – रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन  हिल्स व सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “माझी माय गोदा माय”ह्या प्रदर्शनाचा सांगता समारोह व पारितोषिक वितरण समारंभ गो.ए.सो.चे प्राचार्य राम कुलकर्णी,  प्रा. दिलीप  फडके, रोटरीच्या आशा वेणूगोपाल, आयमाचे निखिल पांचाळ व रोटरी नाईन हिल्स चे अध्यक्ष धनंजय बेळे यांचे उपस्थितीत पार पडला.

गोदावरीच्या छायाचित्रांचे प्रदर्शन नाशिकच्या विविध भागात भरवून “गंगा आपुल्या दारी” हा उपक्रम रोटरीने हाती घेऊन गोदावरीचे सुंदर दर्शन संपूर्ण नाशिककरांना घडवावे असे प्रतिपादन डॉ राम कुलकर्णी यांनी या प्रसंगी केले. साहित्यिक व कलावंतांचे स्फूर्तिस्थान असणाऱ्या गोदावरी नदीच्या विहंगम दृशांचे आगळे वेगळे रूप नाशिककरांसमोर ठेवून प्रदर्शनाचे  उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल अभिनंदनपर भाषणात  गोदावरी संवर्धनात इतर संस्था सोबत सार्वजनिक वाचनालय सक्रिय सहभाग घेऊन एक प्रभावी माध्यम बनेल अशी ग्वाही सावाना चे प्रा. दिलीप फडके यांनी दिली.

आशा वेणुगोपाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन  हि संस्था नेहमीच अभिनव संकल्पना राबवून  काम करीत असून हा स्तुत्य उपक्रम राबवून  रोटरी चे नाव उंचावल्या बद्दल  अध्यक्ष धनंजय बेळे यांचे अभिनंदन केले.  सर्व रोटरी सदस्यांनी अशा लोकाभिमुख व शहराचे नाव उज्ज्वल होईल अश्या प्रकल्पांचे आयोजन करून त्यात सहभागी व्हावे असे आवाहन या प्रसंगी केले. गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी व नाशिकच्या सौंदर्यीकरणा साठी आयमा च्या माध्यमातून सीएसआर निधी करीता प्रयत्न करून ठोस कार्यक्रम राबवू असे आश्वासन आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी यावेळी केले.

गोदावरी नदी व टप्प्या टप्प्यावर बहरत जाणारी नदी काठची संस्कृती, या भागाचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक महत्व विशद करून यापुढेही बिदू ते सिंधू असणाऱ्या गोदामाईची सेवा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून  करत राहणार असल्याचे धनंजय बेळे  यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. सुरेख बोऱ्हाडे यांनी लिहलेल्या गोदावरी संवर्धन गीताचे या वेळी सादरीकरण करण्यात आले. नाशिकच्या जेष्ठ रंगकर्मी व प्रतिथयश कलावंताचा यावेळी सत्कार करण्यात आला.

त्यात प्रामुख्याने चित्रकर दीपक वर्मा, राजेश सावंत, अतुल भालेराव, विजय थोरात, संध्या केळकर, नितीन बिल्डिकर, सुलेखनकार महेंद्र जगताप, छायाचित्रकार राजा पाटेकर आदींचा यथोचित सत्कार करण्यात आला. भाजप नेते जय कुमार रावल, लक्ष्मण सावजी, जेष्ठ साहित्यक उत्तम कांबळे, गोदावरी चित्रपटाचे कलावंत, अभिनेते चिन्मय उदगीरकर, अभिनेत्री नेहा पेंढारकर, गोड प्रेमी राजेश पंडित, गोदाप्रेमी व पर्यावरण प्रेमी संस्थांचे  प्रतिनिधी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी व पत्रकार यांचे सह  सुमारे २५ हजार पेक्षा जास्त प्रेक्षकांनी या प्रदर्शनास  भेट दिली.

या प्रदर्शनात आलेल्या सर्वाना गोदावरीच्या संवर्धनाची “गोदा शपथ” देण्यात आली. सांगता समारोहाच्या उत्तराधार्त विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी रंगकर्मी व छायाचित्रकारांनी आमच्या कलाकृतीस व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. नाशिक हे कलेचे माहेरघर आहे पण त्यास योग्य व्यासपीठ मिळत नव्हते अशी खंत कलाकारांनी व्यक्त केली. आजच्या सन्मानाने आमचा कामाचा हुरूप वाढला असून यापुढेही उत्तमोत्तम कलाकृतींचे निर्माण आम्ही करू असे सांगितले.यावेळी व्यासपीठावर सावाना चे गिरीश नातू, डॉक्टर विक्रम जाधव, सुनील कुटे, रोटरी चे दादा देशमुख, हेमंत खोंड, रोटरी क्लब चे सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन वैभव चावक यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय चव्हाण यांनी केले.

पारितोषिक विजेते
चित्रकला स्पर्धा लहान गट
प्रथम – आराध्य चव्हाण
द्वितीय – अनिश  गोसावी
तृतीय – दिव्या झा

चित्रकला स्पर्धा  मोठा गट
प्रथम – डॉक्टर गणेश
द्वितीय – सुनीता कोल्हे
तृतीय – दिलीप दिघे

छायाचित्र स्पर्धा  – संकल्प चित्र
प्रथम – प्रशांत खरोटे
द्वितीय – मयूर बारगोजे
तृतीय – सौरभ अमृतकर

छायाचित्र स्पर्धा  – स्थिर चित्र
प्रथम – सतीश काळे’
द्वितीय – रघुनंदन मुजुमदार
तृतीय – रविकांत ताम्हणकर

छायाचित्र स्पर्धा  – व्यक्तीचित्र
प्रथम – अशोक गवळी
द्वितीय – सचिन निरंतर
तृतीय – निलेश दाणी

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.