कोरोनावरील उपचारसाठी जगातील पहिल्या अँटीव्हायरल गोळीला सशर्त मंजूरी

0

गेल्या दिड वर्षांपेक्षा अधिक काळ  कोरोनाच्या महामारीवर लस हेच महत्वाचे अस्त्र म्हणून वापरात येत होते. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी जगभरात लसीकरण वेगाने केले जात आहे.मात्र आता कोरोनाच्या उपचारावर लस व्यतिरिक्त आणखीन एक अस्त्र तयार झाले आहे. कोरोनाच्या लक्षणांवरील उपचारासाठी देण्यात येणारी पहिले औषध म्हणून एका गोळीला युकेमध्ये मान्यता मिळाली आहे.मोलनूपिराविर असं या गोळीचं नाव असून  कोव्हिडचे निदान झाल्यावर दिवसातून दोन वेळा ही गोळी देण्यात यावी असे सांगण्यात आले आहे.या जगातील पहिल्या अँटीव्हायरल गोळीला यूकेने सशर्त उपयोगासाठी मंजूरी दिली आहे. यूके हा पहिला देश आहे, ज्याने या गोळीला उपचारासाठी योग्य ठरवले आहे. मात्र ही गोळी किती लवकरात उपलब्ध होईल हे अस्पष्ट आहे.

१८ ते त्यावरील वयोगटातील कोरोना संक्रमित लोकांना या गोळीचा वापर करण्यास मंजूरी दिली आहे.कोरोनाची हलके लक्षणे असलेल्या व्यक्तींना ही गोळी दिवसातून दोन वेळा घ्यावी लागले. ही अँटीव्हायरल गोळी कोरोनाची लक्षणे कमी करते आणि लवकर निरोगी होण्यास मदत करते. रुग्णालयातील रुग्ण कमी करण्यासाठी तसेच गरीब देशांना कोरोना नियंत्रण मिळवण्यासाठी ही गोळी मदत करू शकते. ही गोळी साथीच्या रोगाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन पद्धती, औषधोपचार आणि प्रतिबंध यासाठी उपयुक्त ठरेल.अमेरिका, युरोप आणि काही देशातील संबंधित नियामक या औषधाचा आढावा घेत आहेत.

या औषधाच्या चाचणीमध्ये असं लक्षात आलं आहे की ही गोळी हॉस्पिटलायजेशन किंवा मृत्यूचा धोका पन्नास टक्क्यांनी कमी करते. हे औषध सुरुवातीला फ्लूवरील उपचारासाठी निर्माण करण्यात आलं होतं.हे औषध गेमचेंजर ठरू शकते असं आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी म्हटलं आहे. ज्या रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती खालावली आहे तसेच जे अत्यंत अशक्त आहे त्यांच्यासाठी ही गोळी वरदान ठरू शकते असा विश्वास आरोग्य सचिवांनी व्यक्त केला आहे.

हा आपल्या देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. कोव्हिडवरील उपचारासाठी तोंडावाटे देण्यात येणाऱ्या या औषधाला मान्यता देणारा युनायटेड किंगडम हा पहिला देश ठरल्याचं त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.यूकेने या गोळीचे ४ लाख ८० हजार डोस खरेदी करण्यासाठी मान्यता दिली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.