prsanna

कर्नाटकात काँग्रेस आघाडीवर : भाजपा पिछाडीवर 

काँग्रेसचा खास प्लान  

0

कर्नाटक,दि. १३ मे २०२३ –  कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे कल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये.या निवडणुकीत भाजपला काँग्रेसने मागे टाकत पहिल्या टप्प्यात काँग्रेसला बहुमत मिळालं आहे.आता कर्नाटकातील पहिला निकाल हाती आला असून काँग्रेस चे टी राघुमूर्ती विजयी झाले असून तब्बल १६ हजार मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसने १२० पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला अवघ्या ७२ जागांवर आघाडी मिळाली आहे.

सध्या भाजप ७२, काँग्रेस १२०, जेडीएस २६ आणि इतर ८ असा निकाल हाती येत आहे. कर्नाटकातील सुरुवातीचे आकडे पहिले तर हे तिथे त्रिशंकू आवस्था पाहायला मिळत होते आणि यासर्वांमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत कुमारस्वामी दिसत होते पण आता काँग्रेस आघाडीवर दिसत आहेत. आता कुमारस्वामी कोणता निर्णय घेतात, ते काँग्रेससोबत जातात की भाजपसोबत जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, २००६ मध्ये कुमारस्वामी यांनी भाजप सोबत सत्ता स्थापन केली होती तर २०१८ मध्ये त्यांनी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली होती आणि मुख्यमंत्रीपदावरही ते विराजमान झाले होते. त्यामुळे सध्याच्या कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर कुमारस्वामी कोणता निर्णय घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची समजली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांनी कर्नाटकात तळ ठोकला होता. कर्नाटकात पुन्हा सत्ता आणण्यासाठी या नेत्यांनी कंबर कसली होती. पंतप्रधान मोदी यांनी तर बजरंग बलीचा नाराही दिला होता. मात्र, असं असतानाही कर्नाटकात भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये. दक्षिणेकडील फक्त कर्नाटक राज्यातच भाजपचं सरकार आहे. या राज्यातून सत्ता गेली तर भाजपचं दक्षिण भारतातून उच्चाटन होईल असं चित्र आहे.

काँग्रेसचा खास प्लान  
कर्नाटकात ऑपरेशन लोटस होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांना रोखण्यासाठी खास प्लान तयार केला आहे. स्वत: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आमदारांवर लक्ष ठेवून आहेत.

कर्नाटकात काँग्रेस सत्ता स्थापन करेल : संजय राऊत 
कर्नाटकात काँग्रेस सत्ता स्थापन करेल. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. काँग्रेसचा विजय हा कर्नाटकातील भाजपचा पराभव नसून मोदी आणि शाह यांचा हा पराभव आहे. या दोन्ही नेत्यांनी हा पराभव स्वीकारला पाहिजे. या दोन्ही नेत्यांनी कर्नाटकात तळ ठोकला होता. प्रत्येक निवडणुकीत ते तंबू ठोकतात. पण तरीही कर्नाटकातील जनतेने मोदी आणि शाह यांना झिडकारलं आहे, असा संजय राऊत म्हणाले  राज्या राज्यातून भाजपच्या टोळ्या कर्नाटकात खोके घेऊन आल्या होत्या. पण कर्नाटकातील जनता भाजपच्या दबावाला बळी पडली नाही. आता पराभव झाला तरी तोडफोड करून काही करता येते का ते भाजप पाहत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी मीडियाशी बोलतांना केला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!