मुंबई,दि ८ ऑगस्ट २०२३ – सध्या राज्यात डोळे येण्याच्या साथीने प्रचंड कहर केलाय. महाराष्ट्र भरात डोळे आलेल्या रुग्णांची संख्या आता तब्बत अडीच लाख पर्यंत पोहोचली आहे.
राज्यातील डोळे आलेल्या रुग्णांची संख्या २ लाख ४८ हजार ८५१ वर पोहोचलीय. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्याची गरज निर्माण झालीय. डोळे आलेल्या रुग्णांची सर्वात जास्त संख्या बुलढाण्यात असून, ती ३५ हजार ४६६ वर पोहोचलीय. त्यामुळे डॉक्टरांनी डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे .
राज्यभरात डोळ्यांची साथ पसरल्याने प्रशासनाकडून याबाबत खबरदारी बाळगण्याचंही आवाहन करण्यात येत आहे. सर्दी खोकल्याच्या रुग्णांसोबतच सध्या डोळे येण्याच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. सध्या लहान-मोठे सर्वांमध्ये ही साथ पसरली आहे. डोळ्यांची साथ परसली आहे, अशा वेळी लहान मुलांची काळजी कशी घ्यावी. यापासून लहान मुलांचं संरक्षण कसं करावं हे जाणून घेऊया
शाळेत जाणाऱ्या मुलांना डोळ्यांचा संसर्ग होऊ नये यासाठी काय काळजी घेता येईल ! मुलांना शाळेत तर पाठवावं लागेल,नाहीतर शिक्षणाचं नुकसान होईल.पण,त्यांचं डोळ्यांच्या साथींपासून संरक्षण कसं करावं, असा प्रश्न सर्वच पालकांना पडला असेल तर, अशा परिस्थितीत मुलांचं डोळ्यांच्या फ्लूपासून संरक्षण करण्यासाठीचे उपाय जाणून घ्या.
डोळ्यांच्या साथीपासून लहान मुलांचं ‘असं’संरक्षण करा
मुलांना वारंवार डोळ्यांचा स्पर्श करण्यास मनाई करा.मुलांना वारंवार हात धुण्यास सांगा.
मुलांचा गणवेश स्वच्छ असावा.
मुलांच्या बॅगेत सॅनिटायझर ठेवा आणि ते वापरायला सांगा.
शाळेतून आल्यावर मुलांचे हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा.
स्वच्छ हाताने डोळे पाण्याने धुवा.
संक्रमित व्यक्ती आणि पाळीव प्राण्यांपासून मुलांना दूर ठेवा.
मुलांना योग्य प्रमाणात पाणी पिण्यास सांगा.