नाशिक, दि. २४ जुलै २०२५ : Cooking Competition Nashik गृहिणींच्या आणि फूड क्रिएटर्सच्या कलेला नवे उड्डाण देणाऱ्या “श्रावण महोत्सव २०२५” अंतर्गत राज्यस्तरावरील भव्य पाककला स्पर्धा यंदा अधिक आकर्षक ठरणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने हौशी स्वयंपाक करणाऱ्यांना आता थेट दुबई किंवा बँकॉकच्या टूरची संधी मिळणार आहे!
मिती ग्रुप, मुंबई आणि संस्कृती वैभव, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा यंदा ११ वे वर्ष साजरे करत आहे. राज्यातील ११ ठिकाणी ही स्पर्धा होणार असून, नाशिकमधील प्राथमिक फेरी येत्या १३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजता, प्रसाद मंगल कार्यालय, गंगापूर रोड येथे पार पडेल.
स्पर्धेचा यंदाचा विषय आहे – “ब्रेकफास्टचा पदार्थ”. त्यामुळे सकाळी बनणाऱ्या चविष्ट आणि पौष्टिक पदार्थांची चुरस या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. नाशिककरांना ही संधी त्यांच्या स्वयंपाकातील कौशल्य दाखवण्याची आहे.
स्पर्धेची वैशिष्ट्ये :(Cooking Competition Nashik)
फक्त शाकाहारी पदार्थांनाच मान्यता
घरी बनवलेला पदार्थ स्पर्धास्थळी सादर करावा लागेल
चव, सादरीकरण आणि पौष्टिकता हे मुल्यांकनाचे निकष
प्रवेश पूर्णतः मोफत, मात्र नाव नोंदणी आवश्यक
५ स्पर्धकांची निवड मुंबईतील महाअंतिम फेरीसाठी
अंतिम विजेत्यांना दुबई किंवा बँकॉक-पट्टाया टूर
संस्थेचे अध्यक्ष नंदन दीक्षित म्हणाले की, “या स्पर्धेमुळे केवळ नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक कुटुंबातील लपलेली पाककला जगासमोर येणार आहे. एक वेगळी ऊर्जा आणि स्पर्धेचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.”
स्पर्धेतील विजेत्यांना भरपूर बक्षिसे देण्यात येणार असून, अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांची मुंबईपर्यंत ये-जा आणि राहण्याची व्यवस्था आयोजकांकडून केली जाईल.
स्पर्धेसाठी ९९३०११५७५९ या क्रमांकावर नाव नोंदवावी. संयोजकांकडून वेळेवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संस्कृती वैभव ही संस्था नाशिकमध्ये सांस्कृतिक क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण करत असून, अशा उपक्रमांमधून नाशिकच्या कलाप्रेमी आणि स्वयंपाकप्रेमी लोकांसाठी वेगळी दिशा उभी करत आहे.
तुमच्या हातच्या ब्रेकफास्टच्या खास रेसिपीज आता घरापुरत्या न ठेवता, त्यांना आंतरराष्ट्रीय मंचावर घेऊन जायची ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे वेळ न घालवता आजच नाव नोंदवा आणि आपल्या चवदार कलेने देशाच्या बाहेर झेप घ्या!