राज्यात कोरोनाचे ८६२ ॲक्टिव्ह रुग्ण :टास्क फोर्स मोठी पावलं उचलण्याच्या तयारीत

0

मुंबई,दि,४ जानेवारी २०२४-कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारातील नवा व्हेरिएंट JN.1 आल्यानंतर देशात पुन्हा एकदा भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ८६२ इतकी झाली आहे.काही दिवसांपासून बाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ पाहायला मिळत आहे. बुधवारी राज्यात १३८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आढळले. मुंबईमध्ये २० रुग्ण आढळले. नवी मुंबई ११,नाशिक १०,पुणे शहर ९,पिंपरी चिंचवड ९ रुग्ण आढळले आहेत.या पार्श्वभूमीवर टास्कफोर्स विशेष लक्ष ठेवून आहे. यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याची तयारी देखील सरकारकडून केली जात आहे.

दरम्यान,कोरोनाची लागण झाल्यास पाच दिवस घरातच विलगीकरणात राहण्याचा सल्ला टास्क फोर्सकडून सध्या देण्यात आला आहे. यासंदर्भात लवकरच नियमावली जारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं कोविड टास्क फोर्सकडून ही महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.

गेल्या दोन लाटांमध्ये वयस्कर व्यक्तींना मोठ्या प्रमाणात याचा फटका सहन करावा लागला होता. म्हणूनच अशा व्यक्तींसाठी मास्क लावण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. सर्दी, खोकला, ताप असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात न येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी टाळणे, अशा सूचना देखील करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. आजच यासंदर्भातील नियमावली जारी केली जाऊ शकते असं देखील सांगण्यात येत आहे.

जेएन.१ सब व्हेरियंटचे ३२ रुग्ण
राज्यातील एकूण जेएन.१ कोरोना रुग्णांची संख्या ३२ वर पोहचली आहे.यामध्ये सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात जेएन.१ सबव्हेरियंटचे १७ रुग्णांची नोंद आहे. तर ठाण्यात पाच रुग्णांची नोंद आहे. बीडमध्ये तीन आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन रुग्णांची नोंद आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.त्यामुळे राज्य सरकार अलर्ट झालेय.टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार राज्या सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.सुत्रांच्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झाल्यास रुग्णांनी पाच दिवस गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सने दिला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज यासंदर्भात नियमावली जारी करण्यात येणार असल्याचं समजतं. परदेशातून भारतात येणाऱ्यांवर कोणतेही निर्बंध लावण्यात येणार नसल्याची माहिती मिळतेय.येणाऱ्या सणांच्या काळात पुढील तीन आठवडे महत्त्वाचे असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. जिल्ह्यांमधील रुग्णालय सुविधांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचंही टास्क फोर्सनं सांगितलंय. नवं वर्ष अन् सणासुदीच्या काळामुळे पुढील तीन आठवडे महत्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांमधील हॉस्पिटलायझेशनकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही टास्क फोर्सने म्हटलेय.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.