तिरुअनंतपुरम – कोविड १९ च्या सबव्हेरियंट JN.१ मुळे पुन्हा एकदा देशवासीयांची चिंता वाढवली आहे. हा कोविडचा नवा व्हेरियंटनं भारतात सापडला आहे. कोविड १९ च्या सबव्हेरियंट JN.१ चा पहिला रुग्ण तमिळनाडूमध्ये सापडला आहे. केरळच्या कन्नूर जिल्ह्यात पनूर नगरपालिकेच्या वॉर्ड १ मध्ये करोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबद्दलची माहिती दिली आहे. तर करोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.या दोन घटनांनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यामधील सगळ्या आरोग्य सुविधांचं मॉक ड्रिल सुरू करण्यात आलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे. केरळमध्ये कोविड पसरण्याचा धोका लक्षात घेता आरोग्य मंत्री दिनेश कुंडू राव यांनी आपत्कालीन बैठक बोलावली. मास्क, ऑक्सिजन सिलिंडर, औषधांसह अन्य आवश्यक वस्तूंचा साठा तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केरळला लागून असलेल्या सीमा मात्र खुल्या असतील.याआधी तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यात एक जण कोरोना पॉझिटिव्ह सापडला. तो २५ ऑक्टोबरला सिंगापूरहून परतला होता. तिरुचिरापल्ली जिल्हा किंवा तमिळनाडूतील अन्य ठिकाणी कोरोना स्ट्रेनचे रुग्ण वाढलेले नाहीत.
तिरुचिरापल्लीमध्ये करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाला करोनाच्या JN.१ सब व्हेरिएंटची लागण झाली आहे.या रुग्णा व्यतिरिक्त देशात या सब व्हेरिएंटचा अन्य रुग्ण सापडलेला नाही. JN.१ सब व्हेरिएंट सर्वप्रथम लक्झमबर्गमध्ये सापडला होता. त्यानंतर तो अनेक देशांमध्ये पसरला.केरळच्या कन्नूर जिल्ह्यात पनूर नगरपालिकेच्या वॉर्ड १ मध्ये करोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अब्दुल्ला असं मृत रुग्णाचं नाव असून ते ८० वर्षांचे होते. त्यांना खोकल्याचा त्रास होता. सोबतच श्वास घेण्यासही अडचणी येत होत्या. त्यानंतर या परिसरातील आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. आमदार के. पी. मोहनन यांच्या अध्यक्षतेखाली आपत्कालीन बैठक झाली आहे.