ठाणे,दि २४ ऑगस्त २०२४ –ठाणे,डोंबिवली आणि मुंबईकरांसाठी सेकंड होम म्हणून नाशिक हे सर्वाधिक पसंतीचे शहर असून ठाण्यात क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित तीन दिवसीय नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो या प्रदर्शनामुळे ठाणे आणि व मुंबईकरांचे हे स्वप्न पूर्ण होण्यास निश्चितच मदत होईल असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी काढले . ते या या प्रदर्शना च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, मानद सचिव गौरव ठक्कर, प्रदर्शनाचे समन्वयक मनोज खिवंसरा, सहसमन्वयक शामकुमार साबळे, सहसचिव नरेंद्र कुलकर्णी, सचिन बागड मॅनेजिंग कमिटी सदस्य नितीन पाटील, सागर शहा, अनत ठाकरे व नाशिक मधले सर्व प्रतीथयश बांधकाम व्यवसायिक व मुंबई व ठाणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते
नाशिक व परिसरातील रिअल इस्टेटमधील विविध पर्यायांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होण्यासाठी क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पोचे ठाण्यात आयोजन करण्यात आले आहे. क्रेडाई मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आणि रेरा यामुळे निसर्ग संपन्न आणि प्रगतीशील अश्या नाशिकमधील प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे.
या प्रसंगी बोलतांना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील म्हणाले की अश्या अश्या प्रदर्शनाच्या निमित्ताने नाशिक चे ब्रांडीग होते .या मुळे शहरात गुंतवणूक करणारे आकर्षित होतात. अनेक आघाडीचे विकसक यामध्ये सहभागी झाले असून फ्लॅट्स (२५ लाखा पासून) प्लॉट (१० लाखा पासून), फार्म हाऊस, शेत जमीन, व्यवसायिक असे असंख्य पर्याय येथे उपलब्ध आहेत. नाशिक जिल्ह्यात असे प्रदर्शन नियमित आयोजित करण्यात येतात पण ठाण्या मध्ये 10 वर्षा नंतर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे असेही त्यांनी नमूद केले.
प्रदर्शन ठाणे पश्चिम येथे तीन हात नाका येथील टीपटॉप प्लाझा येथे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत होणार असून या तीन दिवसीय प्रॉपर्टी एक्स्पो मध्ये नाशिकसोबतच इगतपुरी, कसारा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या भागातील अनेक पर्याय उपलब्ध आहेत